कृषी महाराष्ट्र

Market Price – राहाता बाजार समितीत डाळिंबाला २५५०० रुपये उच्चांकी दर

Market Price – राहाता बाजार समितीत डाळिंबाला २५५०० रुपये उच्चांकी दर

 

नाशिक : चालू वर्षी नैसर्गिक आपत्तीच्या (Natural Calamity) तडाख्यात डाळिंब पिकाचा (Pomegranate Crop) आंबिया बहर प्रभावित झाला आहे. फळांची कुज झाल्याने उत्पादनावर (Pomegranate Production) मोठा परिणाम झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादक पट्ट्यातील (Pomegranate Producer Belt) बाजार आवारात आवक (Pomegranate Arrival) घटल्याने पुरवठा कमी झाला आहे. परिणामी, डाळिंबाची लाली (Pomegranate Rate) खुलली आहे. दराला झळाळी मिळत आहे. शुक्रवारी (ता.२३) राहाता बाजार समितीत डाळिंबाला २५५०० रुपये उच्चांकी दर मिळाला आहे. Market Price

संततधार पाऊस व रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट आली आहे. राज्यात उत्पादनाचा आढावा घेतल्यास नाशिक जिल्ह्यात मालेगाव, देवळा व सटाणा तालुक्यात, तर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात काही प्रमाणात माल काढणीयोग्य होऊन सौदे सुरू आहेत. तुलनेत सोलापूर, पुणे विभागात मालाची उपलब्धता कमी आहे. काही ठिकाणी माल उपलब्ध आहे; परंतु प्रतवारी नसल्याची स्थिती आहे.

ऑगस्ट महिन्यात मालेगाव तालुक्यातील सातमाने परिसरात १०० रुपयांवर खरेदी सुरू होऊन १५१ रुपये किलोपर्यंत उच्चांकी दर मिळाला होता. मात्र चालु महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून मालाची उपलब्धता कमी झाल्याने दराने पुन्हा उसळी घेतली आहे. शिवार खरेदीत प्रतिकिलो १७४ रुपयांचा विक्रमी दर मिळाला होता. त्यानंतर हा दर २५० रुपयांवर गेला आहे.

“जानेवारी ते फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला आंबिया बहाराचे टप्प्याटप्प्याने नियोजन केले जाते. मात्र जुलै महिन्यापासून पावसाची झड कायम आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणी आल्या. परंतु रासायनिक खते व फवारण्या कमी करून जैविक पद्धतीने पीक संरक्षण केल्याने गुणवत्तापूर्ण माल तयार झाला.”
संजय भामरे, डाळिंब उत्पादक, काळगाव, ता. साक्री, जि. धुळे.

“एकीकडे बाहेर राज्यातील माल येत असला तरी गुणवत्तेमुळे नाशिक व धुळे जिल्ह्यातील मालाला सोलापूर, बेंगलोर व दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी पसंती दिली आहे. कमीतकमी ९० ते कमाल १७१ रुपये मागील महिन्यात दर मिळाले आहेत.”
रवींद्र पवार, नाशिक विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संघ.

उत्पादनातील अडचणी अशा…

– सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे फळांच्या गुणवत्तेवर परिणाम

– फळांची गळ, डाग पडणे यामुळे पीक संरक्षण खर्च वाढला

– प्रतिकूल वातावरणामुळे मालाची प्रतवारी खालावली

– उष्णेतेमुळे तेलकट डाग रोगांचा प्रादुर्भाव अधिक

राज्यातील प्रमुख बाजार आवारातील दर स्थिती : (२३ सप्टेंबर)

बाजार समिती…आवक…किमान…कमाल…सरासरी

संगमनेर…१३१…२,५००…२०,०००…११,२५०

श्रीरामपूर…३७…१,२००…३,५००…२,३५०

राहता…१,१७३…१,०००…२५,५००…५,०००

पंढरपूर…९४३…१,५००…१५,६००…७,०००

सांगोला…४३६…२,०००…१३,०००…७,०००

सोलापूर…१,३५६…१,०००…१५,०००…३,९००

नाशिक…६१७…५००…१०,०००…७,५००

(संदर्भ: agrowon.com )

इतर माहिती :- फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर मिळणार ५० % सबसिडी

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top