कृषी महाराष्ट्र

Turmeric Cultivation : हळद लागवड राज्यात पडली लांबणीवर

Turmeric Cultivation : हळद लागवड राज्यात पडली लांबणीवर

 

राज्यातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहेच. गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढू लागली आहे. शेतकऱ्यांनी हळद लागवडीसाठी पूर्वतयारी केली असून, शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. त्यातच पाणीटंचाई आणि वाढत्या उष्णतेचा फटका हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला असल्याने यंदाच्या हंगामात हळद लागवड एक महिना लांबणीवर पडणार आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्यात हळद लागवडीसाठी पाण्याची कमतरता नव्हती. हळद लागवडीस तापमानही अधिक होते. परंतु तापमानात चढ-उतार होत होती. त्यामुळे एप्रिल महिन्यात लागवडपूर्व मशागती पूर्ण करून सऱ्या सोडल्या होत्या. शेतकऱ्यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधला होता. तर इतर भागांत मे च्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात हळद लागवडीस प्रारंभ झाला होता. जून महिन्यात हळद लागवडीस गती आली होती. मुळात गतवर्षी पाण्याची टंचाई होती. परंतु उपलब्ध पाण्यामुळे हळद पीक तग धरून होते.

यंदाच्या हंगामात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अक्षय तृतीयेला हळद लागवडीचा मुहूर्त साधत आहे. तर इतर भागात मे च्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापासून हळद लागवड करण्याचे नियोजन शेतकरी करत असतात. यंदा मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यात उष्णता वाढली आहे. हळद पिकासाठी २५ ते २८ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. परंतु तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गतवर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे या वर्षी पाण्याचे मुख्य संकट ओढावले. पाणीटंचाई कितीही असली तरी पश्‍चिम महाराष्ट्रात सध्या पुरेसे पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवड करण्याचे दृष्टीने पूर्वमशागती पूर्ण केलेल्या आहेत. तर काही भागात हळद लागवडीसाठी सऱ्याही सोडलेल्या आहेत. परंतु लागवडीनंतर पाणी अपुरे पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या हळद लागवड थांबवली.

सध्या शेतकरी पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे. त्यातच तापमानात वाढीचा फटका हळद लागवडीवर झाला. त्यामुळे राज्यात हळद लागवड एक महिना लांबणीवर पडणार असल्याचे चिन्न आहे. Turmeric Cultivation

शेतकऱ्यांची सावध पावले

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या दरात दुप्पट वाढ झालेली आहे. हळदीला दराची झळाळी आहे. त्यामुळे शेतकरी हळद लागवड करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. काही शेतकरी हळदीच्या क्षेत्रात वाढ करण्याचे नियोजनही करताहेत. पण पाण्याची कमतरता आणि वाढते तापमान यामुळे हळद लागवड करण्यासाठी शेतकरी सावध पावले टाकत आहेत.

बियाणे मागणी झाली कमी

हळदीचे बियाण्याच्या उत्पादनात घट आहे. यंदा पाण्याचे संकट आहेच. परिणामी, पाणीटंचाई आणि वाढती उष्णता यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे करण्याची इच्छा असूनही शेतकऱ्यांनी हळद बियाणे खरेदी करणे सध्या थांबवले आहे. तापमान कमी झाल्यानंतर आणि पाऊस पडल्या नंतरच बियाणे खरेदीसाठी शेतकरी पुढे येतील, असा अंदाज हळद बियाणे व्यापाऱ्यांनी सांगितला. Turmeric Cultivation

Turmeric Cultivation, हळद लागवड

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top