कृषी महाराष्ट्र

अतिवृष्टीचे ५८ कोटी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ! वाचा सविस्तर

अतिवृष्टीचे ५८ कोटी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ! वाचा सविस्तर

अतिवृष्टीचे

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, पूर्णा तालुक्यांतील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप (Crop Damage Subsidy) सुरू आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत (District Central Cooperative Bank) गुरुवार (ता.१६)पर्यंत या चार तालुक्यांतील ६६ हजार ८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५८ कोटी ३८ लाख रुपये एवढे अनुदान जमा करण्यात आले, अशी माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.

२०२२ च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, पूर्णा या चार तालुक्यांतील ९२ हजार ७३७ बाधित शेतकऱ्यांच्या ५६ हजार १७५ हेक्टरवरील जिरायती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.

बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने आर्थिक मदत देण्यासाठी ७६ कोटी ३९ लाख ८० हजार रुपये निधी डिसेंबर महिन्यात मंजूर करण्यात आला. Crop Damage

त्यात परभणी तालुक्यातील ४२ हजार ११८ बाधित शेतकऱ्यांच्या २७ हजार २७४ हजार हेक्टरवरील पीक नुकसानीबद्दल ३७ कोटी रुपये, सेलू तालुक्यातील ८ हजार ६२६ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४८२ हेक्टरवरील पीकनुकसानीबद्दल ७ कोटी रुपये,पाथरी तालुक्यातील १० हजार १४३ शेतकऱ्यांच्या ७ हजार १६२ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीबद्दल ९ कोटी ७४ लाख रुपये, पूर्णा तालुक्यातील ३१ हजार ८५० शेतकऱ्याच्या १६ हजार २५७ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीबद्दल २२ कोटी १० लाख रुपये निधीचा समावेश आहे.

परंतु हा निधी बुधवारी (ता. ८) जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. पीक नुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत ३ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत दिली जात आहे.

संबंधित तलाठ्यांनी तयार केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या यादीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीद्वारे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे.

तालुकानिहाय अनुदान वितरण गुरुवार ता. १६ पर्यंत (रक्कम कोटी रुपये)

तालुका –  शेतकरी संख्या  – वितरित रक्कम
परभणी-      २४६७१               २७.९४
सेलू –            ५००९                 ३.१९
पाथरी-         १२४९१                 ८.५३
पूर्णा –          २४९११                 १८.७०

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top