कृषी महाराष्ट्र

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता २७ फेब्रुवारीला ! वाचा सविस्तर माहिती

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता २७ फेब्रुवारीला ! वाचा सविस्तर माहिती

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी (Prime Minister Kisan Sanman Nidhi) या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये देते. पीएम किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सरकारकडून १० कोटी शेतकऱ्यांच्या (Agriculture) खात्यात १२व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती. तर आता शेतकरी आतुरतेने १३व्या हप्ता कधी येणार याची वाट पहात आहे. त्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे.

सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत (Prime Minister Kisan Sanman Nidhi) नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी (farmers) ई-केवायसी (e KYC) आधार अनिवार्य केले आहे.

शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e KYC) पूर्ण केल्यावरच त्यांना हप्ता मिळेल. त्याशिवाय त्यांचा हप्ता येणार नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Prime Minister Kisan Sanman Nidhi) योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण १२ हप्ते जमा झालेत आणि आता १३व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘या’ दिवशी होणार हप्ता जमा

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १३वा हप्ता २७ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ई-केवायसी न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना १२वा हप्ता मिळाला नव्हता. आता त्या शेतकऱ्यांना १२ व्या हप्त्याची आणि १३व्या हप्त्याची रक्कम मिळून ४ हजार रुपये खात्यावर जमा होणार आहेत.

लाभार्थी स्थिती आणि पेमेंट तपशील असे तपासा –

1) सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या
2) सर्वात वर ‘फार्मर्स कॉर्नर’ पर्याय असेल, त्यावर क्लिक करा. येथे लाभार्थी स्थिती पर्याय निवडा, जिथे तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.
3) एक यादी असेल ज्यामध्ये शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या बँक खात्यावर पाठवलेली रक्कम लिहिली जाईल.

पीएम किसान हेल्पलाइन नंबर – यादीमध्ये नाव नसेल किंवा इतर काही अडचणी येत असल्यास या १५५२६१ / ०११-२४३००६०६ हेल्पलाईन नंबर वर कॉल करा.

source : krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top