कृषी महाराष्ट्र

Kharif Sowing : राज्यात खरीपाची ९३ टक्के पेरणी ! वाचा सविस्तर कोणत्या पिकांची किती पेरणी ?

Kharif Sowing : राज्यात खरीपाची ९३ टक्के पेरणी ! वाचा सविस्तर कोणत्या पिकांची किती पेरणी ?

 

Kharif Sowing : राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. मात्र अद्यापही काही भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. तरी राज्यात खरीप पीक पेरा (kharif swoing update) ९३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाने दिली आहे. एकीकडे पेरा चांगला असला तरी दुसरीकडे मात्र मराठावाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूर या तीन जिल्ह्यातील सोयाबीनवर तंबाखू पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.

कृषी आयुक्तालयाच्या माहितीनुसार, राज्यातील खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. सात ऑगस्टअखेर प्रत्यक्षात १३१.७५ लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे. राज्यात बहुतेक भागात पेरणीची कामे उरकत आली आहेत. काही ठिकाणी कापूस, सोयाबीन, तूर तसेच भाताच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत.

यंदा राज्यात तुरीचा पेरा १०.७१ लाख हेक्टरवर झाला आहे तर १०.७१ लाख हेक्टर इतकाच भात पुर्नलागवड देखील झालीय. तसंच सोयाबीनचा ४८.३८ लाख हेक्टर पेरा झाला असून ४१.४८ इतका भाताचा पेरा झाला आहे. Kharif Sowing

राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान पूर्ण १०० टक्के पाऊस झाला आहे. या दरम्यान सरासरी ६०३ मिलीमीटर इतका पाऊस होता. तर यंदा प्रत्यक्षात ६०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या खरिपात राज्यात २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होते. त्यापैकी १९.७० लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा पूर्ण झालेला आहे. खतेदेखील ५३.३९ लाख टनाच्या आसपास पुरविली आहेत. त्यापैकी शेतकऱ्यांनी आतापर्यंत २९.२६ लाख टन खते विकत घेतली आहेत. अजूनही २४.१३ लाख टनाचा साठा उपलब्ध आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके आणि बियाणे याबाबत समस्या निर्माण झाल्यास तात्काळ तक्रार करावी, असं आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. तसेच ९८२२४४६६५५ या क्रमांकावर व्हॉटस्अपवर तक्रार करावी. या दरम्यान तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आयुक्तालयाने स्पष्ट केलं आहे.

source : krishijagran

Kharif Sowing

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top