‘पोकरा योजना’ ३०२ गावांतील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ! वाचा संपूर्ण माहीती
पोकरा योजना
Yavatmal News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Agriculture Sanjeevani Project) जिल्ह्यात ३०२ गावांसाठी फायदेशीर ठरत आहे.
या प्रकल्पातून जिल्ह्यातील सात हजार ३६५ शेतकऱ्यांना स्प्रिंकलर व ठिबक संचाचा लाभ मिळाल्याने या शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबत नगदी पिकांचीही लागवड केली आहे.
गेल्या मार्च २०१८मध्ये ‘पोकरा’ प्रकल्प राज्यातील खारपण पट्टा, आत्महत्याग्रस्त व अवर्षणग्रस्त अशा १४ जिल्ह्यांत सुरू करण्यात आला. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासोबत, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचतगटांसाठी सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात हा प्रकल्प १६ तालुक्यांतील ३०२ गावांमध्ये राबविला जात आहे. त्यात पाच हेक्टरपर्यंच्या शेतकऱ्यांना नोंदणी करता येते. POCRA
जिल्ह्यातील १२ हजार ८३० शेतकऱ्यांना या योजनेतून आतापर्यंत विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. त्यात १२ हजार ५४० शेतकऱ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यात आला आहे. त्यातील निम्या शेतकऱ्यांनी सिंचनासाठी स्प्रिंकलर व ठिबक संचाचा लाभ घेतला आहे.
सहा हजार ३७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्प्रिंकलर संच, तर ९९३ शेतकऱ्यांना ठिबक संचासाठी अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन
‘पोकरा’ योजनेतून आधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींसाठी लाभ देण्यात येतो. शिवाय बदलत्या पर्यावरणाला तोंड देण्यासाठी बीबीएफ पॉलिहाऊस, शेडनेटसारखे तंत्रज्ञान वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.
या योजनेतून परसबाग कुक्कुटपालन, वर्मी कंपोस्ट, नाडेप, कंपोस्ट आदी युनिटसाठी, तसेच ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, शेतीसाठी लागणारे अत्याधुनिक अवजारे, शेततळे, फळबाग, फुलशेती लागवड, वनशेती, मत्स्यशेती, रेशीम शेतीसाठी साहाय्य देण्यात येते. POCRA
योजनेनिहाय लाभार्थ्यांची संख्या
कुक्कुटपालन लाभार्थी एक, नाडेप कंपोस्ट ८४, ठिबक संच ९३१, अवजारे २६३, शेततळे ४६, बीबीएफ १,४७२, फळबाग ३२१, मत्सशेती-दोन, पॉलिहाऊस पाच, रिचार्ज विहिरी पाच, बीजोत्पादन १,०६०, रेशीम शेती २६, शेडनेट १६, स्प्रिंकलर ६,३७२, पंप ७६३, विहिरी १५०, पाइप्स ६१३, खारपान शेती ३०७, इतर ३८ अशाप्रमाणे एकूण १२ हजार ५४० शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. पोकरा योजना पोकरा योजना
source:agrowon