पंजाबराव डख हवामान अंदाज : राज्यात आज मुसळधार पाऊस 29 एप्रिल 2023
पंजाबराव डख हवामान
राज्यात एक महिन्याहून अधिक दिवस होऊन गेले मात्र अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नाही. राज्यात एप्रिल महिन्यात २८,२९,३० या तारखेला विजांसह वादळी वारा आणि गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भ या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. इतर भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा या भागात ऑरेंज अलर्ट जारी
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड.
विदर्भ : अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया.
वादळी पावसाचा इशारा या भागात येलो अलर्ट जारी :
मध्य महाराष्ट्र, : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर.
मराठवाडा : धाराशिव, लातूर.
विदर्भ : बुलढाणा, वाशीम, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली पंजाबराव डख हवामान
Source : hellokrushi