Cotton Price : कापसाच्या दरात वाढ ! आणखी होणार का वाढ ? वाचा सविस्तर
Cotton Price
Cotton Rate | महाराष्ट्रात कापूस हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नगदी पीक आहे. विदर्भात कापूस पिकाला आवश्यक मृदा आणि वातावरण असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणत कापसाचे उत्पादन घेतात. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कापसाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
परंतु, मागच्या काही महिन्यांपासून कापसाचे दर (Today’s Cotton Price) कमी झाले होते. परंतु पुन्हा आता कापसाच्या दरामध्ये (Cotton Rate) वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कापसाच्या दरात किती रुपयांची वाढ झाली आहे.
किती रुपयांची झाली ?
कालपासून अनेक बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता कापसाचे दर 100 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळणारं आहे. तर वायद्यांमधील वाढ ही 1 हजार 240 रुपये इतकी आहे.
हा कापसाचा बाजार भाव हमीभावापेक्षा अधिक आहे. मागील दोन महिन्यांपासून कापूस दरवाढाची मागणी केली जात होती. तसेच दरवाढीचे वायदेही केले जात होते.
कापसाच्या दरात आणखी होणार का वाढ ?
मात्र, कालपासून या वायद्यांमध्ये सुधारणा दिसत आहे. त्यामुळे आता कापूस दरवाढीचा परिणाम काही बाजार समित्यांवर देखील दिसत आहे. भारतात कापसाचे उत्पादन जास्त असल्यामुळे याचा दबाव त्याच्या दरावर होत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कापसाची होणारी आवक कमी झाल्यास कापसाचे दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचा अंदाज कापूस अभ्यासाकांनी व्यक्त केला आहे.
कापूस बाजारभाव खालील प्रमाणे (ता. ०४/०७/२०२३):
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
04/07/2023 | ||||||
सावनेर | — | क्विंटल | 1000 | 6900 | 6925 | 6925 |
पारशिवनी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 160 | 6500 | 6800 | 6700 |
मनवत | लोकल | क्विंटल | 2400 | 6000 | 7385 | 7300 |
वरोरा | लोकल | क्विंटल | 7 | 7000 | 7100 | 7050 |
वरोरा-माढेली | लोकल | क्विंटल | 98 | 6900 | 7000 | 6950 |
वरोरा-खांबाडा | लोकल | क्विंटल | 16 | 7000 | 7100 | 7050 |
काटोल | लोकल | क्विंटल | 95 | 6700 | 7050 | 6900 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 3000 | 7000 | 7450 | 7200 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 490 | 7340 | 7430 | 7400 |
source:mieshetkari