Weather Update : राज्यात आज विजांसह पावसाचा इशारा ! आजचा हवामान अंदाज
Weather Update Pune : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीसाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. सोमवारपर्यंत (ता. २५) पश्चिम राजस्थानातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान आहे.
आज (ता. २४) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, कोटा, गुणा, सतना, पुरूलिया, कृष्णनगर, ते मनिपूरपर्यंत विस्तारला आहे. दक्षिण बिहार आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, मध्य प्रदेश पासून आसाम पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. Rain Forecast
राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २४) विदर्भ, कोकणात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. Weather Update
उपसागरात पुन्हा कमी दाबाचे संकेत
बंगालच्या उपसागरात एकामागून एक कमी दाब प्रणाली तयार होत आहेत. शुक्रवारपर्यंत (ता. २९) उत्तर अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार असून, शनिवारपर्यंत (ता. ३०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. वायव्य दिशेकडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : ठाणे, पालघर.
मध्य महाराष्ट्र : जळगाव, नाशिक, नगर, पुणे.
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड,
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
source : agrowon