Rain forecast : मध्य महाराष्ट्र, कोकणात आज पावसाचा अंदाज ! वाचा सविस्तर
Rain forecast : पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान झाले आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ९) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, ही प्रणाली आज (ता. ९) निवळून जाणार आहे. यातच पावसाला पोषक हवामान आणि ढगाळ आकाशामुळे राज्याच्या कमाल, किमान तापमानात चढ-उतार होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. Rain forecast
पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ९) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. तर रायगड, पुणे, सोलापूर जिल्ह्यातही विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोकणात कमाल तापमानाचा पारा ३४ ते अंशांच्या दरम्यान असून, उर्वरित राज्यातही कमाल तापमानात वाढ-घट सुरूच आहेत. बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३० ते ३४ अंशाच्या दरम्यान होते.
किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी काहीशी कमी झाली आहे. बुधवारी (ता. ८) निफाड येथील गहु संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३१.७ (२१.४), जळगाव ३४.० (१४.९), कोल्हापूर ३०.६ (२२.५), महाबळेश्वर २५.६ (१८.२), नाशिक ३१.२ (१७.२), निफाड ३२.० (१३.४), सांगली ३२.० (२४.१), सातारा ३१.६ (२२.८), सोलापूर ३१.० (२१.४), सांताक्रूझ ३५.६ (२३.८), डहाणू ३६.८ (२२.८), ब्रह्मपुरी ३५.० (१८.०), चंद्रपूर ३२.६(१७.०), गडचिरोली ३३.२ (१६.६), गोंदिया ३२.५ (१५.८), नागपूर ३२.५ (१५.८), वर्धा ३३.०(१७.६), वाशीम ३३.६(१७.०) यवतमाळ ३३.५ (१७.५),