कृषी महाराष्ट्र

लसूण लागवड संपूर्ण माहिती

लसूण लागवड संपूर्ण माहिती

 

आज आपण या लेखामध्ये लसूण लागवड माहिती मराठी पाहणार आहोत. लसणासाठी आवश्यक हवामान कोणते, जमीन कशी लागते, कोणत्या हंगामामध्ये लागवड केली जाते, जाती कोणकोणत्या, बियाण्यांचे प्रमाण दर हेक्टरी किती वापरावे, पूर्व मशागत कशी करावी, लागवड कशी करावी, त्यासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत रोग आणि कीड व्यवस्थापन इत्यादी संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये पाहणार आहोत.

माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

 

लसणाचे फायदे

लसून हे रोजच्या आहारामध्ये वापरले जाणारे एक आवश्यक मसाल्याचे पीक आहे. अन्नपदार्थ अधिक स्वादिष्ट होण्यासाठी दैनंदिन आहारात लसणाचा उपयोग केला जातो. त्यामध्ये प्रोपील डाय सल्फाइड आणि लिपीड ही द्रव्ये आढळतात. लसणाचा वापर हा लोणचे, चटण्या, भाजी इत्यादींमध्ये केला जातो. लसुन हा औषधी म्हणूनही वापरला जातो. पोटाच्या विकारांवर, पचनशक्ती, कानदुखी, डोळ्यातील विकार, डांग्या खोकला इत्यादींच्या उपचारासाठी लसणाचे गुणधर्म लाभदायक ठरतात.

हवामान आणि जमीन

लसुन पिकासाठी समशीतोष्ण हवामान उपयुक्त असते. मात्र अति थंड आणि अति उष्ण हवामान या पिकाला मानवत नाही. समुद्रसपाटीपासून एक हजार ते एक हजार तीनशे मीटर उंचीपर्यंत लसूण पिकाची लागवड करता येते. लसुन पिकाच्या वाढीच्या काळात 75 सेंटिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला, तर या पिकाची वाढ चांगली होत नाही. याकरिताच ऑक्टोबर महिन्यामध्ये लसणाचे लागवड करून उत्पादन घेतले जाते. दिवसाचे 25 ते 28 अंश डिग्री सेल्सिअस आणि रात्रीचे 10 ते 15 अंश सेल्सिअस तापमानामध्ये लसणाच्या गड्ड्यांची वाढ चांगली होते. मध्यम खोलीच्या भरपूर सेंद्रिय खते घातलेल्या रेती मिश्रित कसदार तणावरहित जमिनीमध्ये पिकाची वाढ चांगली होते. हलक्या प्रतीच्या जमिनी किंवा चिकन मातीच्या जमिनी या लसुन पिकासाठी योग्य नसतात.

पूर्वमशागत

लसुन पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी. तर मध्यम खोलीची नांगरट करून जमिनीतील ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमीन तयार करतेवेळी हेक्टरी 30 गाड्या म्हणजेच 15 टन शेणखत जमिनीमध्ये मिसळावे. पाणी देण्यास सोईस्कर आकाराचे अथवा सपाट वाफे तयार करून घ्यावेत.

जाती आणि लागवड पद्धत

महाराष्ट्र राज्यात पांढऱ्या रंगाच्या जामनगर जातीची तसेच गोदावरी, श्रवेता या लसून जातीची लागवड केली जाते. लसूण पिकाची लागवड ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर महिन्यात साध्या वाफ्यात १०*७.५ सेंटीमीटर वर केली जाते. लसुन लागवड करताना लसणाचे कांदे फोडून त्याच्या पाकळ्या म्हणजेच कुड्या सुट्ट्या करून त्या कुड्या एकेक मातीमध्ये लावल्या जातात आणि त्यावर मातीने झाकले जाते. हेक्टरी ५०० ते ६०० किलो त्याच्या स्वरूपात बियाणे लागते. लागण झाल्यानंतर लसणाच्या कुड्या निघणार नाहीत अशा पद्धतीने पाणी द्यावे.

बियाणाची निवड

लसणाचे कांदे एकावर एक अशा गोलाकार पाकळ्यांनी बनलेली असते. त्यांना सुट्ट्या करण्यासाठी ते कांदे पायाखाली तुडवून मग फोन साफ करून घेतले जाते. लागवडीसाठी मोठ्या आणि परिपक्व पाकळ्यांचा उपयोग करावा.

खते

लसुन लावणीच्या वेळी हेक्टरी ५० किलो युरिया ३० किलो सुपर फॉस्फेट आणि १०० किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. यामुळे पिकाची वाढ अतिशय जोमदार होते.

आंतर मशागत

लसणाच्या पाकळ्या लावल्यानंतर खुरपणी एक महिन्यानंतर करून घ्यावी.
त्यानंतर असेल तर दोन तीन एक दोन वेळा निंदणी करावी.
पिकाच्या लागवडी नंतर अडीच महिन्यांनी लसणाचे गड्डे तयार होण्यास सुरुवात होते.
यावेळी हात कोळपणी करून माती मोकळी करावी म्हणजे मोठ्या आकाराचे आणि चांगले लसणाचे कांदे तयार होतील.
त्यानंतर खुरपणी अथवा कोळपणी करू नये.

किड व रोग व्यवस्थापन

किडी
बोकडया : या प्रकारची किड पानातील रस शोषुन झाडांना अश्यक्त बनवते.

उपाय
सायपर मेथ्रीन 25 टक्‍के प्रवाही 5 मिली हा 10 लिटर पाण्‍यात मिसळून त्याची लसनावर फवारणी करावी.

रोग
करपा व भुरी – या दोन्‍ही रोगांमुळे प्रथम पाने गर्द तांबडया रंगाची व पांढ-या रंगाची होतात आणि झाडे मरतात.

उपाय
करपा आणि भुरी या रोगांसाठी ताम्र्रयुक्‍त बुरशीनाशकाचा वापर करावा.

पाणी व्यवस्थापन

लसणाच्या लागवडीनंतर पाण्याची पहिली पाळी सावकाश द्यावी.
दुसरी पाळी दोन ते चार दिवसांनी द्यावी आणि हवामानानुसार आठ ते बारा दिवसांनी द्यावी.
लसणाचे कांदे पक्के होताना वर पाण्याच्या दोन पाळीतील अंतर वाढवावे.
काढणीच्या दोन दिवस अगोदर लसणाला पाणी द्यावे.
त्यानंतर वर पाणी अजिबात देऊ नये. म्हणजे लसणाचे कांदे काढणे सोपे जाते आणि ते तुटत नाहीत.

काढणी आणि उत्पादन

लसुन लागवडीनंतर साधारणपणे साडेचार ते पाच महिन्यांनी हे पीक काढणीस तयार होते.
कांद्याची पात पिवळी पडायला लागली, म्हणजेच लसणाचे कांदे काढण्यासाठी तयार झाले आहेत असे समजावे.
लसुन पतीसह तसाच बांधून ठेवावा म्हणजे तो सात आठ ते दहा महिने व्यवस्थित टिकतो.
जर लसणाची विक्री करायची असेल, तर त्या कांद्याची पात कापून लसनाचे कांदे स्वच्छ करून बाजारात पाठवावेत.
लसणाचे उत्पादन हे जमिनीची पोत खते आणि जात यावर अवलंबून असते.
दर हेक्‍टरी साधारणपणे नऊ ते दहा टन लसूण पिकाचे उत्पादन मिळते.

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top