कृषी महाराष्ट्र

बोगस बियाणे, खताबाबत करू शकता थेट तक्रार ! कृषिमंत्री मुंडेंनी जाहीर केला शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन नंबर

बोगस बियाणे, खताबाबत करू शकता थेट तक्रार ! कृषिमंत्री मुंडेंनी जाहीर केला शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन नंबर

 

Fertilizer Liking: बियाणे आणि खतांच्या लिकिंग प्रकरणी तक्रार देण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी या नंबरवर तक्रार करावी, असं आवाहनही मुंडे यांनी केले.

राज्यात ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची बोगस बियाणे आणि खताचं लिकिंग करून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी बाळसाहेब थोरात यांनी केली होती. यावर राज्य विधिमंडळा पावसाळी अधिवेशनात बोलताना मुंडे यांनी ९८२२४४६६५५ या हेल्पलाईन नंबरवर तक्रार नोंदवण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या बोगस बियाणे आणि खत प्रकरणावर दोन दिवस विरोधी पक्षाने रान तापवलं होतं. बुधवारी (ता.१९) कृषिमंत्री मुंडेंवर विरोधकांनी हल्लाबोल केला. त्यानंतर विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुंडे यांनी सरकार शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेईल, अशी ग्वाही दिली.

दरम्यान, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यांनी बुधवारी मंत्रालयात कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी यांची बैठक घेतली.

यावेळी कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत आढावा घेतला होता. या बैठकीत मुंडे यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक सुरू करण्याचा निर्देश दिले होते.

गुरुवारी (ता.२०) मुंडे यांनी ९८२२४४६६५५ नंबर जाहीर करत बोगस बियाणे आणि खतांच्या लिकिंगबाबत शेतकरी तक्रार करू शकतात, अशी माहिती विधिमंडळात दिली.

source : agrowon

बोगस बियाणे

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top