कृषी महाराष्ट्र

Cotton Market : कापूस वायद्यांमध्ये चांगली वाढ ! देशातील कापूस लागवडीची स्थिती काय ? वाचा सविस्तर

Cotton Market : कापूस वायद्यांमध्ये चांगली वाढ ! देशातील कापूस लागवडीची स्थिती काय ? वाचा सविस्तर

 

Pune News : कापूस वायद्यांमध्ये आज चांगली सुधारणा झाली होती. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस वायदे वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांनी ८४ सेंटचा टप्पा पार केला. तर देशातील वायदे ५८ हजारांवर पोचले. तर बाजार समित्यांमध्ये कापूस दराची स्थिती संमिश्र होती.

देशातील बाजारात आज कापूस दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. वायद्यांमध्ये आज चांगली सुधारणा झाली होती. कापसाचे वायदे मागील दोन दिवसांपासून सतत वाढत आहेत. कापूस वायद्यांनी ३ जुलैनंतर पहिल्यांदाच ५८ हजार रुपयांचा टप्पा पार केला होता. ऑगस्ट कापूस वायदे आज सायंकाळपर्यंत ४४० रुपयांनी वाढले होते.

कापसाच्या वायद्यांनी आज ५८ हजार ८० रुपयांची पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा दिसून आली. कापूस वायदे आज ८४. १७ सेंटवर पोचले होते. तब्बल एक महिन्यांतर कापूस वायद्यांनी ८४ सेंटचा टप्पा पार केला होता. Cotton Market

कापूस वायद्यांसह आज काही बाजारांमध्ये कापूस दरात क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा झाली होती. तर बहुतांशी भागात कापूस दर स्थिर दिसले. कापसाला आज प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार २५० रुपयांचा भाव मिळाला. कापसाच्या भावात मागील तीन महिन्यांपासून २०० ते ३०० रुपयांचे चढ उतार येत आहेत. कापूस भाव ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान फिरत आहेत. पण वाढलेले दर टिकत नाहीत. तसेच निचांकी दरावरून पुन्हा सुधारणा दिसते. पण शेतकऱ्यांना अपेक्षित अशी मोठी वाढ होत नाही.

चालू हंगामातील कापूस लागवडीचा विचार करता १४ जुलैपर्यंत १२ टक्क्यांची घट झाली होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मते देशात ९६ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. तर गेल्याहंगामात याच तारखेपर्यंतची लागवड १०९ लाख हेक्टरवर होती. पण उद्योगांच्या मते देशातील कापूस लागवड आजपर्यंत १०७ लाख हेक्टरवर पोचली. कापूस लागवड गेल्यावर्षीपेक्षा केवळ २ टक्क्यांनी पिछाडीवर असल्याचा दावा उद्योगांनी केला. केंद्र सरकार उद्या म्हणजेच शुक्रवारी लागवडीचा अहवाल प्रसिध्द करेल. यातून नेमकी किती लागवड झाली, याची माहिती मिळेल. Cotton Market

आतापर्यंतच्या लागवडीचा विचार करता, आंध्र प्रदेशातील लागवड ५८ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. आंध्र प्रदेशातील लागवड जवळपास २ लाख हेक्टरने कमी दिसते. तर कर्नाटकातही लागवड सव्वादोन लाख हेक्टरने कमी असून गेल्यावर्षीपेक्षा क्षेत्र ४७ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. पंजाबमध्येही कापूस लागवड आतापर्यंत २६ टक्क्यांनी कमी असल्याचा दावा उद्योगांनी केला. पण उद्योगासह व्यापारी आणि स्टाॅकिस्टचे लक्ष सरकारच्या उद्याच्या अहवालाकडे आहे.

कापूस बाजारात मागील एक महिन्यापासून होणारे चढ उतार खूपच कमी होते. त्यामुळे दरातील वाढीने ७ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातही एक महिन्यानंतर दरात चांगली वाढ दिसली. आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा देशातील बाजारात परिणाम दिसू शकतात. तसेच कापूस बाजार देशातील कापूस लागवड, पिकाची स्थिती, पाऊसमान आणि बाजारातील कापूस आवकेवर अवलंबून असतील, असेही जाणकारांनी सांगितले. Cotton Market

source : agrowon

Cotton Market Update, cotton price, cotton rate, Cotton Rate Update, Cotton Rates, कापसाचे आजचे भाव, कापसाचे भाव आजचे

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top