कृषी महाराष्ट्र

Market Update : सोयाबीनमध्ये मोठे चढ उतार ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

Market Update : सोयाबीनमध्ये मोठे चढ उतार ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

 

१) कापूस दरात पुढील काही दिवसांमध्ये सुधारणा

कापसाच्या वायद्यांमध्ये झालेली वाढ आज दुपारपर्यंत टिकून होती. कापूस वायदे आज ५८ हजार ३०० रुपयांवर होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८४.३३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तसेच काही बाजारांमध्ये आजही किंचित सुधारणा पाहायला मिळाली. पण सरासरी भावपातळी ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होती. कापूस दरात पुढील काही दिवसांमध्ये काहीशी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  Market Update

२) बाजारात मोसंबीची आवक वाढली

राज्यातील बाजारात मोसंबीची आवक काहीशी वाढली. मोसंबीला चालू हंगामात उन्हाचा चटका, पाण्याचा ताण आणि आता जोरदार पावसाचा फटका बसत आहे. असं असूनही उठाव सामान्य असल्याने मोसंबीचे दर स्थिर दिसतात. मोसंबीला आज ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मोसंबीचे भाव आणखी काही दिवस स्थिर दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) हरबऱ्यावरतील दबाव वाढला

नाफेडने हरभऱ्याची विक्री सुरु केल्याने बाजारावरील दबाव वाढला. अनेक बाजारात हरभरा भाव ५० रुपयांनी कमी झालेले दिसले. हरभऱ्याची विक्री आज सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान झाली. सरकारने हरभरा डाळही कमी दरात बाजारात आणल्याचा दबाव हरभरा बाजारावर आला. त्यामुळे हरभरा दरात पुढील काळात सुधारणा होण्याची शक्यता कमीच असल्याचं व्यापारी सांगत आहेत. Market Update

४) लसणाच्या दरात मोठी वाढ

राज्यातील बाजारात मागील एक महिन्यापासून लसणाची आवक कमी झाली. बाजारातील आवक कमी असली तरी मागणी मात्र टिकून आहे. यामुळे लसणाच्या दरात मोठी वाढ झाली. लसणाचे भाव प्रतिक्विंटल ८ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. लसणाची बाजारातील आवक आणखी काही महिने वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

५) सोयाबीनला ४ हजार ५०० ते ५ हजारांचा भाव

सोयाबीनच्या दरात सकाळपासूनच चढ उतार पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात झालेली सुधारणा आज दुपारपर्यंत कमी झाली. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत जवळपास एक टक्क्याने कमी झाले होते. सोयाबीनच्या वायदे १३.९३ डाॅलरवर पोचले होते. तर सोयापेंड दोन टक्क्यांनी नरमले होते. सोयापेंडचे वायदे दुपारी २ वाजेपर्यंत ४१३ डाॅलरवर होते.

आज आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने वायद्यांमधील चढ उतार जास्त दिसू शकतात. देशातील भावपातळी आजही स्थिर होती. सोयाबीनला आजही ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सनी आज ५० रुपयांनी दर वाढवले होते. प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ५० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव वाढलेल्या पातळीवर टिकत नसल्याने देशातील बाजारातही घट दिसून येत आहे. तर देशातील सोयाबीन लागवड आतापर्यंत १२ टक्क्यांनी कमीच दिसत आहे. त्यातच यंदा लागवडीला अनेक भागात उशीर झाला. अमेरिकेतही काही भागात पावसाने पुन्हा ओढ दिली. अमेरिका आणि भारतातील सोयाबीन जवळपास एकाच वेळी बाजारात येते. त्यामुळे भारतीय सोयाबीन बाजाराची नजर अमेरिकेतील बाजारावरही आहे, असे जाणकारांनी सांगितले.

source : agrowon

Market Update

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top