कृषी महाराष्ट्र

Onion Market : कांद्याची आवक कमी ! दरात झाली काहीशी सुधारणा

Onion Market : कांद्याची आवक कमी ! दरात झाली काहीशी सुधारणा

 

बाजारातील कांद्याची आवक कमी झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर पडल्याने शेतकरी अडचणीत आला होता.

कांद्याचे भाव आता उत्पादन खर्चाच्या पातळीवर आल्याचे शेतकरी सांगत आहेत. कांद्याचे भाव आज १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. पावसामुळे देखील नुकसान झाले होते.

काही राज्यांमध्ये भाव यापेक्षा जास्त आहेत. पण त्या राज्यांमध्ये कांदा उत्पादन कमी होते. परराज्यातून आवक होत असल्याने दर अधिक दिसतात. मात्र शेतकऱ्यांकडे आता जुना कांदा जास्त शिल्लक नाही.

पण कांद्याच्या भावातील दरवाढ कायम राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. आता काही दिवसात नवीन कांदा बाजारात येईल.

दरम्यान, टोमॅटो खूपच महाग झाला आहे. देशातील बाजारात टोमॅटो आवक खूपच कमी होत आहे. बाजारात आवक सरारीच्या तुलनेत केवळ ३० टक्क्यांपर्यंत होत आहे. मात्र टोमॅटोची मागणी टिकून आहे.

source:krishijagran

Onion Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top