कृषी महाराष्ट्र

अण्णा भाऊ साठे थेट कर्ज योजनेचा लाभ घ्या ! जिल्हा व्यवस्थापकांनी केले आवाहन

अण्णा भाऊ साठे थेट कर्ज योजनेचा लाभ घ्या ! जिल्हा व्यवस्थापकांनी केले आवाहन

 

Direct Loan Scheme नंदुरबार : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत (Annabhau Sathe Board) राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेचा (Loan Scheme) लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले. नंदुरबार जिल्ह्याकरिता वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी लाभार्थ्यांना थेट कर्ज योजनेत लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.

मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातींतील व्यक्तींना या योजनेद्वारे अर्थसाह्य करण्यात येणार आहे. Loan Scheme

अर्जदारास महामंडळाच्या नियमानुसार व्यवसायास अनुरूप असलेली आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. या योजनेत साधारणपणे पुरुष व महिला ५० टक्के आरक्षण राहील, तसेच राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कृत व्यक्ती, सैन्यदलातील वीरगतीप्राप्त झालेल्यांच्या वारसातील एका सदस्यास प्राधान्य देण्यात येईल. (Loan Scheme)

अर्जदारास कर्जमंजुरी व वितरणापूर्वी त्याच्या वारसदाराचे बंधपत्र द्यावे लागेल. कर्ज योजनेचे अर्ज कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून, अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २३ फेब्रुवारी आहे.

हे अर्ज कार्यालयीन वेळेत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत स्वीकारले जातील. उद्दिष्टांपेक्षा जास्त कर्जप्रकरणे प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची निवड शासन आदेशानुसार लॉटरी पद्धतीने समितीमार्फत करण्यात येईल.

मातंग समाजातील होतकरू महिला, पुरुष, प्रशिक्षित लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित नंदुरबार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक ०२५६४-२१०१८१ वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

अण्णा भाऊ साठे कर्ज योजना अंतर्गत कोण लाभ घेऊ शकतो ?

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (Lokshahir Anna Bhau Sathe Dev.Co.Ltd) अंतर्गत अण्णा भाऊ साठे कर्ज योजना अंतर्गत मातंग समाजात समाविष्ट असणाऱ्या खालील १२ जाती आणि पोट जातींना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.

1. मातंग 2. मांग 3. मिनी-मादींग 4. दानखणी मांग 5. मादींग 6. मदारी 7. मांग महाशी 8. मांग गारुडी 9. राधे मांग 10.मांग गारुडी तर २०१२ पासून 11. मादगी 12. मादिगा ह्या दोन पोट जाती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top