कृषी महाराष्ट्र

हायड्रोपोनिक्स चारा : दुभत्या जनावरांना देण्याचे फायदे

हायड्रोपोनिक्स चारा : दुभत्या जनावरांना देण्याचे फायदे

हायड्रोपोनिक्स चारा

हायड्रोपोनिक्स चाऱ्यामध्ये (Hydroponics Fodder) विविध अन्नघटक चांगल्याप्रकारे उपलब्ध असल्याने त्यांचा फायदा आपल्या जनावरांना होतो, असे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

अमेरिकेतील दक्षिण डकोटा राज्यातील डॉ.अल्वारो गार्सिया यांनी हायड्रोपोनिक्स चाऱ्याच्या वापराबाबत संशोधनाचे निष्कर्ष नोंदविले आहे.

दुग्धव्यवसाय (Dairy Business) अधिक फायदेशीर करावयाचा असेल तर आपणास गोठा व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, आरोग्य व प्रजनन व्यवस्थापन (Reproduction Management) या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागते.

सातत्यपूर्ण चांगला आहार वर्षभर पुरवठा हा दूध व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.

आपल्याकडे काही प्रमाणात जनावरांना चरण्यासाठी सोडतात तसेच गोठ्यामध्येसुद्धा सकस चारा देतात.

परदेशात जमीन मुबलक असल्याने येथील शेतकरी जनावरांना चरण्यासाठी मोठ्या प्रमाणात सकस चाऱ्यासाठी कुरणे तयार करतात.

जनावरांना पुरेसा हिरवा पौष्टिक चारा उपलब्ध करून देतात. असा चारा जनावरांच्या आरोग्यासाठी तसेच खालेले अन्न पचण्यासाठी व मौल्यवान अन्नघटक मिळण्यासाठी फायदेशीर ठरतो. (hydroponic fodder)

१) रानात येणारे लहान गवत सुद्धा फार पौष्टिक व पचनशील असते. जनावरांच्या पोटातील इतर अन्न पचण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका पार पाडते.

तसेच कोठी पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करते. हा चारा हिरवागार व लुसलुशीत असतो, चवदार असल्याने जनावरांची यास पसंती असते.

२) जनावरे चारताना पूर्ण वाढ न झालेला कोवळा, लुसलुशीत चारा खाण्यास पसंत करतात. त्यामुळे जास्त लाळ तयार होते, पचनासाठी मदत होते.

या चाऱ्यात पाण्याचे प्रमाण आपल्या इतर चाऱ्यापेक्षा जास्त असते परंतु पचनासाठी आवश्यक असणारी एन्झाईम, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व आणि क्षार भरपूर प्रमाणात असून ते उपलब्ध होण्याचे प्रमाण सुद्धा जास्त आहे.

हा चारा कोवळा असल्याने मोड आलेले धान्य किंवा हायड्रोपोनिक्स पद्धतीने तयार केलेला चारा यामध्ये असलेले बरेच गुणधर्म यामध्ये आहेत. (hydroponic fodder)

३) अलीकडे जनावरांना एकाच ठिकाणी बांधून चारा देऊन अधिक दूध उत्पादन करण्याकडे आपला कल आहे.

परंतु बांधून न ठेवता मुक्तसंचार गोठा, सकस आहारावर भर देणे महत्त्वाचे आहे. पूर्वी आपल्याकडील जनावरे कोवळ्या हिरव्यागार लुसलुशीत कुरणामध्ये चरत होती. त्याचा फायदा जनावरांच्या चांगल्या वाढीसाठी होत होता.

परंतु आता चराऊ कुरणे उपलब्ध नसल्याने आपण जनावरांना बंदिस्त करून त्यांना एकाच जागेवर चारा देतो.

असा चारा देताना जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळावे यासाठी आपण कोवळा चारा न देता पूर्ण वाढ झालेला चारा देतो. त्यामुळे चराऊ कुरणामध्ये जो लाभ जनावरांना मिळत होता, तो आता मिळत नाही. hydroponic fodder

हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनाचा फायदा :

१) मुक्तसंचार गोठ्यातील किंवा बांधलेल्या जनावरांना चराऊ कुरणांचा फायदा पोहोचवायचा असेल तर आपणास हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन युनिटची मदत होऊ शकते.

हायड्रोपोनिक्स चाऱ्यामध्ये विविध अन्नघटक चांगल्याप्रकारे उपलब्ध असल्याने त्यांचा फायदा आपल्या जनावरांना होतो, असे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

अमेरिकेतील दक्षिण डकोटा राज्यातील डॉ.अल्वारो गार्सिया यांनी हायड्रोपोनिक्स चाऱ्याच्या वापराबाबत संशोधनाचे निष्कर्ष नोंदविले आहे.

डॉ.अल्वारो गार्सिया यांना फलटण परिसरातील जे पशुपालक गेली ८ ते १० वर्ष जनावरांना हायड्रोपोनिक्स चारा खाऊ घालतात अशा पशुपालकांच्या अनुभवांची माहिती पाठविण्यात आली होती.

डॉ.अल्वारो गार्सिया यांनी हायड्रपोनिक्स चाऱ्याबाबत केलेल्या संशोधनानुसार आपल्या पशुपालकांना देखील या चाऱ्याचा चांगला फायदा झाला आहे.

आहारात नियमित हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे फायदे :

१) संतुलित आहारामध्ये जर स्टार्चच्या पुरेशा प्रमाणात साखरेचा समावेश असेल कोठी पोटात तंतुमय पदार्थांचे विघटन,

मायक्रोबियल प्रथिनांचे निर्मिती, कर्बोदके यांचे पचन व कोठी पोटाचा सामू चांगला प्रमाणात वाढू शकतो. जेव्हा जलद पचण्यायोग्य प्रथिन स्रोत जलद पचण्यायोग्य कार्बोहायड्रेट स्त्रोतासोबत असतो तेव्हा सर्वोच्च सूक्ष्मजीव प्रथिने उत्पन्न होते. कोठीपोटातील उपयोगी सूक्ष्मजीवाची संख्या वाढते.

२) जनावराचा रवंथ वाढतो.
३) आहार जास्त वेळ चावून खाल्ल्याने वेळ वाढते, जास्त प्रमाणात लाळ निर्माण होते.
४) कोठी पोटातील सामू नियंत्रित झाल्याने सूक्ष्म जिवांची संख्या चांगल्या प्रमाणात वाढते. याचा परिणाम म्हणजे जास्त असलेले सूक्ष्मजीव जनावरांची पचनक्षमता वाढवतात.
५) जनावरांची खाद्य कार्यक्षमता खूप चांगली होते. ते कमी आहारात जास्त दूध देतात.
६) जनावर कोठी पोटातील खाद्य किण्वन प्रक्रियेतून मिथेन तयार करतात. जर आहार असंतुलित असेल किंवा गाईच्या शरीरातील पचन यंत्रणा ठीक नसेल किंवा जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थांचे सेवन झाल्यास मिथेन उत्सर्जन जास्त प्रमाणात होते.

अशावेळी जनावरांना जर हायड्रोपोनिक्स चारा आहारात दिला तर कोठीपोटाचे आरोग्य चांगले राहते आणि २७ टक्के कमी मिथेन उत्सर्जन होते.

डॉ.शांताराम गायकवाड, ९८८१६६८०९९ ( सरव्यवस्थापक, गोविंद मिल्क डेअरी, फलटण,जि.सातारा )

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top