कृषी महाराष्ट्र

कालवडीला जंतनाशक देण्याचे फायदे काय ? वाचा संपूर्ण

कालवडीला जंतनाशक देण्याचे फायदे काय ? वाचा संपूर्ण

कालवडीला जंतनाशक

जनावरांमध्ये जंत अन्नद्रव्यांच शोषण करतात. त्यामुळेजनावरांच्या शरीराची वाढ घटते.अन्नद्रव्याबरोबर जंत हे खनिजांचही शोषण करतात.

पुनरुत्पादन तसच कालवड माजावर येण्यासाठी वेळेवर जंत निर्मूलनाच्या (Deworming) उपाययोजना राबविण आवश्यक आहे.ढोबळमानाने शेळी-मेंढीच्या सर्व वयोगटांमध्ये जंतनाशकाची मात्रा नियमितपणे दिली जाते;

पण गाय-म्हैस यांच्यासाठी सर्व वयोगटांमध्ये त्याची आवश्‍यकता भासत नाही.अपवाद वासराचा वयोगट ते कालवड माजावर येईपर्यंत आणि त्यानंतर प्रसूतिपूर्व व पश्‍चात जंतनाशकाची मात्रा दिल्यास गाय-म्हशीच आरोग्य चांगल ठेवण्यासाठी व उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.

जंतप्रादुर्भावामुळ काय नुकसान होत? आणि वेळेवर जंतनाशक दिल्यामुळे काय फायदा होतो? याविषयी परोपजीवीशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथील डॉ.बाबासाहेब नरळदकर यांनी दिलेली माहिती पाहुया.

जंतप्रादुर्भावामुळे होणार नुकसान

जंताचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पचनसंस्थेतील आम्ल स्रवण करणाऱ्या ग्रंथीना इजा होते.आम्लाच संभाव्य प्रमाण घटल्यामुळ प्रथिनांच पचन होत नाही.

शरीराची वाढ व वजन घटते.अनेक प्रजातीचे जंत हे कोलेसीस्टोकायनीन यांच्या प्रमाणात वाढ घडवून आणतात. यामुळ मेंढीमध्ये व इतर जनावरांच्यामध्ये ३० टक्के भूक मंदावते. परिणामी वजनात घट होते.

नियमीतपणे जंतनाशक देण्याचे फायदे काय आहेत ?

अनेक संशोधनातून हे सिद्ध झालय, की केवळ वय वाढल म्हणजेच कालवड माजावर येत नाही, तर त्यांच ठरावीक वजन त्या प्रजातीनुसार वाढाव लागत तरच कालवडी माजावर येतात.

जंतनाशकाची मात्रा दिल्यानंतर योग्य वयामध्ये योग्य वजन वाढून कालवडी माजावर येतात. कालवड माजावर येण्याच्या वेळेपर्यंत ठराविकपणे जंतनाशकाची मात्रा दिल्यास त्यांच्या माजावर येण्याचा कालावधी ४४ दिवसांनी घटतो.

म्हणजेच त्या पहिले वेत ४४ दिवस लवकर देतात.त्यांच्यापासून ४४ दिवस लवकर वाढीव दुग्धोत्पादन मिळत. कालवडीला जन्मल्यापासून ते थेट माजावर येण्याच्या वयापर्यंत म्हणजेच वयाच्या ३४ ते ३७ महिने वयापर्यंत वेळापत्रकानूसार जंतनाशक द्यावीत.

यासाठी पशुतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळ्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व स्थानिक ठिकाणानुसार वेळापत्रक तयार कराव. यासोबतच कालवडीच माजावर येण्याच वय व पुनरुत्पादन क्षमता कार्यान्वित ठेवण्यासाठीही प्रयत्न करावा.

Source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top