कृषी महाराष्ट्र

Carrot Planting : गाजर लागवड माहिती

Carrot Planting : गाजर लागवड माहिती

 

Carrot Planting : गाजर म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो सुंदर लाल रंगाचा आणि चवदार गाजराचा हलवा.गाजरा मध्ये व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळते.गाजराचे कच्चा सॅलडच्या स्वरूपात खूप फायदे आहेत.

माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

 

 

हवामान :

गाजर पिकासाठी 8 ते 28 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. तर जास्त उष्ण असलेल्या भागात त्याची वाढ होत नाही. म्हणजे का जर हे थंड हवामानातील पीक आहे.

माती निवड. गाजराच्या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी चिकन माती सर्वोत्तम ठरते. त्यात गाजराचे पिक चांगल्या प्रकारे येते. तर पाणी साचलेल्या जमिनीत मुळे कुजण्याची व पीक निकामी होण्याचा धोका राहतो.

लागवड वेळ :

ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यानचा काळ हा गाजर पेरणीसाठी योग्य असतो. तर ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या काळात लागवड केली जाते.

लागवड पध्‍दती : (Cultivation methods)

गाजराच्‍या लागवडीसाठी जमिन खोल उभी – आडवी नांगरुन घ्‍यावी. जमिन सपाट करुन घ्‍यावी. बी सरीवरंब्‍यावर पेरावी. दोन वरंब्‍यातील अंतर 45 सेमी ठेवावी बियाची टोकून पेरणी करतांना 30 ते 45 सेमी अंतरावर सरी ओढून दोन्‍ही बाजूंनी 15 सेमी अंतरावर टोकन पध्‍दतीने लागवड करावी. पाभरीने बी पेरतांना दोन ओळीत 30 ते 45 सेमी अंतर ठैवावी आणि नंतर विरळणी करुन दोन रोपातील अंतर 8 सेमी ठेवावे.

एक हेक्‍टर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे 4 ते 6 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे उगवून येण्‍यास पेरणीनंतर 12 ते 15 दिवस लागतात. पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्‍यात भिजत ठेवल्‍यास हा काळ कमी करता येतो. Carrot Planting

जमीन मशागत व शेण खत टाकणे :

गाजर पिकासाठी निवडलेल्या शेतात शेणखत टाकणे अत्यंत महत्त्वाचे असते.कारण त्यामुळे शेतातील उत्पादनही वाढते. शेणखत टाकण्याआधी जमीन 2 ते 3 वेळा नांगरणी करून व्यवस्थित भुसभुशीत करून घ्यावी.शेवटच्या नांगरणीच्या वेळी हेक्टरी 35 टन शेणखत वापरल्यास गाजरांचे चांगले उत्पादन होण्यास मदत होते.

गाजराच्या सुधारित जाती.

1.पुसा केसर

2.पुसा मेघालय

3.गाजर 29

4.हिसार रसाळ

शेतकर्याने ह्या जाती च्या वानाची ज्यात्या भागा नुसार निवड करावी.

सिंचन व्यवस्थापन :

गाजराच्या पिकासाठी 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी देणे फायदेशीर ठरते. तर यासाठी पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था शेतात असली पाहिजे.

खत व्यवस्थापन :

गाजर पिकासाठी मुख्यत 3 खतांची आवश्यकता असते.

1. पोटॅश

2.डॅप

3.नायट्रोजन गाजर लागवडीच्या वेळी या खतांचा वापर 30 किलो नत्र व 30 किलो पालाश प्रति हेक्‍टरी खत म्हणून वापरावा.

खर्च,उत्पादन,कमाई: एक हेक्टर क्षेत्रामधून गाजराच्या काही जाती पासून 150 क्विंटल पर्यंत उत्पादन निघू शकते. गाजर पिकास तयार होण्यास 70 ते 75 दिवसांचा कालावधी लागतो. तर 1 किलो गाजर पिकवण्यासाठी 6 ते 8 रुपये खर्च येतो.तर एखाद्या व्यक्तीने 1 किलो गाजर पिकवले तर त्याची किंमत 7 ते 8 रुपये असते.

कीड रोग आणि त्‍यांचे नियंत्रण : (Pest diseases and their control)

गाजराच्‍या पिकावर साडया भुंगा (कॅरट विव्हिल) सहा ठिपके असलेले तुडतुडे आणि रूटफलाय या किडीचा उपद्रव होतो. सोंडया भुंगा आणि तुडतुडे या किडींच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 10 मिली मेलॅथिऑन मिसळून फवारावे. गाजरावर रूटफलाय या किडीची प्रौढ माशी गर्द हिरव्‍या ते काळसर रंगाची असते.

या किडिच्‍या अळया पिवळसर पांढ-या रंगाच्‍या असून त्‍या गाजराची मुळे पोखरुन आत शिरतात आणि आतील भाग खात त्‍यामुळे गाजराची मुळे वेडीवाकडी होतात आणि कुजतात. गाजराची पाने सुकतात. या किडीच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 3 मिली डायमेथॉएट मिसळून फवारावे. गाजराच्‍या पिकावर करपा, भुरी, मर पानांवरील ठिपके इत्‍यादी रोंगाची लागण होते.

गाजराची बाजारात ₹ 40 प्रति किलोपर्यंत असते. त्यानुसार पाहिल्यास 1 हेक्‍टरमधून सुमारे 7 लाख ते 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. Carrot Planting

Carrot Planting

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top