कृषी महाराष्ट्र

Cotton Market : कापूस आवक जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात कशी होतेय ? वाचा संपूर्ण

Cotton Market : कापूस आवक जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात कशी होतेय ? वाचा संपूर्ण

 

पावसामुळे सोयाबीनच्या दरावर दबाव

1. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज सुधारणा पाहायला मिळाली. दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १३.४३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी आज ३९४ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशात मात्र सोयाबीन स्थिर होते. सोयाबीनची भावपातळी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान होती. देशातील बाजारात सोयाबीनच्या दरावर दबाव आहे. पण पुढील काळात देशातील सोयाबीन लागवड आणि पाऊसमान यामुळे बाजारात बदल दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. Market Bulletin

हळदीची बाजारातील आवक घटली

2. देशातील बाजारात हळदीच्या दरात सुधारणा पाहायला मिळत आहे. बाजारातील घटलेली आवक आणि वाढलेली मागणी यामुळे हळदीच्या बाजाराला आधार मिळाला. वायद्यांमध्ये सध्या हळद प्रतिक्विटंल ९ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर बाजार समित्यांमध्ये हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. हळदीच्या भावातील सुधारणा आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ज्वारी उत्पादनात काहीशी वाढ

3. मागील हंगामात देशातील ज्वारी उत्पादनात काहीशी वाढ झाली होती. पण देशात ज्वारीचा वापर वाढल्याने मागणीत लक्षणीय वाढ झाली होती. यामुळे बाजारात ज्वारीची टंचाई जाणवत होती. याचा आधार ज्वारीच्या भावाला मिळाला. आजही ज्वारीला देशातील बाजारात सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपये भाव मिळाला. चालू खरिपात सध्या तरी ज्वारीचा पेरा अधिक दिसतो. पण हाती उत्पादन किती येते यावरून ज्वारीचे दर ठरतील, असा अंदाज ज्वारी व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. Market Bulletin

जांभळाचे भावही चांगले

4. राज्यातील बाजारात जांभळाची आवक वाढली आहे. पुणे, मुंबई, जळगाव, अमरावती या बाजारांमध्ये जांभूळ जास्त येत आहे. तर जांभळाचे भावही सध्या चांगले दिसतात. चांभळाला गुणवत्तेनुसार प्रतिक्विंटल ५ हजार ते ६ हजार रुपये भाव मिळत आहे. तर मोठ्या शहरांमधील भाव जास्त आहे. चालू जांभूळ हंगामात सध्याचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

कापूस दरात काहीसे चढ उतार

5. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. तर देशात कापूस बाजार स्थिरच दिसतो. देशात मागील तीन महिन्यांपासून कापूस भाव दबावात आहेत. आज दुपारपर्यंत इंटरकाॅन्टीनेंटल एक्सचेंजवर कापूस वायदे ८२ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. कापूस वायद्यांमध्ये वाढ दिसली. देशातील बाजारात मात्र कापूस वायदे ५६ हजार ९४० रुपयांवर होते. बाजार समित्यांमध्ये मात्र कापूस दरावरील दबाव कायम आहे.

कापसाला आज सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपये भाव मिळाला. कापसाचे भाव वाढत नसल्याने शेतकरीही कापूस विक्री वाढवत असल्याचे दिसते. सध्या कापूस बाजारातील आवक सरासरी ३२ हजार गाठींच्या दरम्यान आहे.

एरवी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारातील कापूस आवक ४ हजार गाठींच्या दरम्यान असते. जुलै महिन्यात शेतकरी खरिप लागवडी आणि आंतरमशागतीच्या कामात व्यस्त असतात. पण यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस मागे ठेवला होता. त्यामुळे सध्याची आवक जास्त दिसते.

याचाही दबाव बाजारावर असल्याचे सांगितले जाते. देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज चुकले. त्यामुळे कापूस दराची पातळी अपेक्षेच्या विरुध्द राहीली. यापुढे कापूस बाजारावर देशातील लागवड आणि पिकाची स्थिती कशी राहते, याचाही परिणाम होऊ शकते, असे व्यापार आणि अभ्यासकांनी व्यक्त केला.

source:agrowon

Cotton Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top