कृषी महाराष्ट्र

Fruit Crop Insurance : चिकू, डाळिंब, पेरू, द्राक्षासाठी पीकविमा लागू ! वाचा सविस्तर

Fruit Crop Insurance : चिकू, डाळिंब, पेरू, द्राक्षासाठी पीकविमा लागू ! वाचा सविस्तर

 

Nashik News : राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार २०२३-२४ या वर्षाकरिता नाशिक जिल्ह्यातील डाळिंब, चिकू, लिंबू, पेरू व द्राक्ष (क) या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

हवामानातील बदलांचा फळपिकांवर होणाऱ्या विपरित परिणामांपासून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहण्यासाठी फळपीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले.

राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार २०२३-२४ या वर्षाकरिता नाशिक जिल्ह्यातील डाळिंब, चिकू, लिंबू, पेरू व द्राक्ष (क) या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

हवामानातील बदलांचा फळपिकांवर होणाऱ्या विपरित परिणामांपासून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहण्यासाठी फळपीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले. Fruit Crop Insurance

पंतप्रधान फळपीक विमा योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक असून, योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास त्याबाबतचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर कर्ज मंजूर केलेल्या बँकेत सादर करण्यात यावे, जेणेकरून बँक विमा हप्ता कपात करणार नाही, असेही सोनवणे यांनी सांगितले.

सर्वसाधारणपणे ज्या महसूल मंडलांत संबंधित फळपिकाखालील क्षेत्र २० हेक्टरपेक्षा जास्त आहे. अशा अधिसूचित मंडलांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण लागू राहणार असून कमी व जास्त पाऊस, पावसातील खंड, सापेक्ष आर्द्रता, किमान तापमान व गारपीट आदी हवामान धोक्यापासून संरक्षण दिले जाणार आहे.

त्याचप्रमाणे अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहरापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. संत्रा, डाळिंब व द्राक्ष) यामध्ये एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो. Fruit Crop Insurance

तसेच या योजनेसाठी जिल्ह्याकरिता रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, महसूल मंडलांत स्थाप न केलेल्या महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत ग्राह्य धरण्यात येणाऱ्या प्राप्त आकडेवारीती ल तरतुदीनुसार भरपाई देण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी कळविले.

फळपीक विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाचा अर्ज व विमा हप्ता सेतू केंद्र सामूहिक सेवा केंद्रामार्फत (सीएससी) ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या १८००१८०१५५१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे, असे सोनवणे यांनी कळविले.

असे असेल फळपीक विमा संरक्षण

पीक विमा संरक्षित रक्कम (रुपये) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता (रुपये) समाविष्ट धोके विमा संरक्षण कालावधी

डाळिंब १,३०,००० ६५०० पावसाचा खंड, जास्त पाऊस १५ जुलै ते १५ ऑक्टोबर, १६ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर

पेरू ६०,००० ३,००० कमी पाऊस, पावसाचा खंड व जास्त तापमान १५ जून ते १४ जुलै, १५ जुलै ते १५ ऑगस्ट

चिकू ६०००० ३००० जास्त आर्द्रता व जास्त पाऊस १ जुलै ते ३० सप्टेंबर

लिंबू .७०,००० ३५०० कमी पाऊस, पावसाचा खंड १५ जून ते १५जुलै, १६ जुलै ते १५ ऑगस्ट

द्राक्ष (क) ३,२०,००० ६४,००० जास्त पाऊस, आर्द्रता व किमान तापमान १५ जून ते १५ नोव्हेंबर

source : agrowon

Fruit Crop Insurance

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top