कृषी महाराष्ट्र

Cotton Market Price : जूनमध्ये पहिल्यांदाच कापूस दबावात ! आता पुढे काय ? वाचा सविस्तर

Cotton Market Price : जूनमध्ये पहिल्यांदाच कापूस दबावात ! आता पुढे काय ? वाचा सविस्तर

Cotton Market

Cotton Bajarbhav : कापूस भावात आज अनेक ठिकाणी नरमाई दिसून आली. खरं तर सरकारनं हमीभाव जाहीर केल्यानंतर दरात वाढ होण्याची अपेक्षा होती. पण खरिपातील लागवडी सुरु झाल्या तरी अपेक्षित भाव मिळत नाही. तसं पाहिलं तर जून महिना म्हणजे बाजारासाठी ऑफ सिझन.

पण डिसेंबरपेक्षा जून महिन्यातील भाव कमी आहेत. कदाचित हे पहिल्यांदाच घडताना दिसत आहे. पण पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील कापूस आवक कमी होत जाऊन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारनं दोन दिवसांपूर्वी कापूस हमीभावात ९ टक्क्यांची वाढ केली. लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार २० रुपये हमीभाव मिळणार आहे. तर सध्याचे बाजारभावही याच पातळीदरम्यान आहेत. विशेष म्हणजेच जून महिन्यात कापसाचे भाव हमीभावाच्या दरम्यान असल्याची पहिलीचं वेळ असेल, असे शेतकरी आणि व्यापारी सांगतात.

सध्या बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मागील आठवड्यात कापसाच्या भावात चांगली वाढ झाली होती. पण दोन दिवसांमध्ये पुन्हा २०० रुपयांनी भाव नरमले. Cotton Market

कापसाचे भाव जूनमध्ये दबावात असण्याला काही कारणं आहेत. खरं तर यंदा उत्पादन घटल्यानं चांगला भाव मिळणं अपेक्षित होतं. पण झालं उलटं. सध्या कापसाच्या उत्पादनावरूनही वेगवेगळी मतं आहेत. यंदा सीएआयचा अंदाज २९८ लाख गाठींचा आहे.

तर सीसीआय आणि सीओसीपीसी या दोन्हींचा अंदाज ३४३ लाख गाठींचा आहे. म्हणजेच दोन्हीच्या अंदाज ४५ लाख गाठींची तफावत आहे. कापूस अंदाजातील तफावतीचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आणखी खूप कापूस शिल्लक आहे, असं सातत्यानं सांगून दरावर दबाव ठेवला गेला.

गेल्या हंगामात मार्च महिन्यानंतर १० ते १२ हजारांचा भाव पाहिल्यानंतर यंदा शेतकऱ्यांनी कापूस मागं ठेवला. यंदाही मार्चनंतर दरात मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण यंदा मार्चनंतर कापूस भावात घट झाली. मे महिन्यात तर निचांकी भाव मिळाला.

खरिपातील कापूस लागवडीची वेळ आली तरी कापूस भाव दबावातच आहेत. ऐन ऑफ सिझनमध्ये भाव पडले. भाव कमी असतानाही मे महिन्यात जवळपास ३० ते ३५ लाख गाठी कापूस बाजारात आल्याचे व्यापारी सांगतात. कारण जूनमध्ये खरिपाच्या पेरण्या सुरु होतात.

पेरणीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी कापूस विकला. तर अनेक शेतकऱ्यांकडे साठवण्याची सुविधा नसल्याने पावसाआधी कापूस विक्रीचा निर्णय घेतला. त्यामुळे कापसाचे भाव कमी होत असतानाही बाजारातील आवक जास्तच राहिली.

शेतकऱ्यांकडे किती कापूस शिल्लक ?

सीसीआयच्या मते ५ जूनपर्यंत देशातील बाजारात २८३ लाख गाठी कापूस बाजारात आला. सीएआयचा अंदाज गृहीत धरला तर केवळ १५ लाख गाठी कापूस शिल्लक आहे. तर सीसीआयचा अंदाज पाहिला तर ५९ लाख गाठी कापूस बाजारात यायचा. उत्पादनातील या गोंधळामुळे बाजारात संभ्रम तयार झाला. आजही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे.

पण शेतकरी आणि अभ्यासकांच्या मते आता जास्तीत जास्त १० टक्के म्हणजेच कापूस शिल्लक आहे. पण यातील सर्वच कापूस लगेच बाजारात येणार नाही. यातील काही शेतकरी जास्त काळ थांबतील. शिल्लक कापसापैकी ५ ते ६ टक्केच कापूस आता बाजारात येईल. Cotton Market

पुढे बाजारावर कशावर अवलंबून ?

पण सध्याच्या भावापेक्षा कापूस दरात नरमाई येणार नाही. कारण आता शेतकऱ्यांकडे कापूस कमी आहे. बाजारातील कापूस आवक आता मे महिन्याच्या तुलनेत निम्म्यावर आली. पुढील काळात आवक आणखी कमी होईल. त्यातच खरिपातील लागवडींनाही उशीर होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुजरात आणि महाराष्ट्रात दोन आठवडे चांगल्या पावसाची शक्यता कमी आहे. म्हणजेच लागवडीचा वेग कमी राहील. माॅन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातही पाऊसमान या दोन्ही राज्यांमध्ये सरासरी राहण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे कापूस पिकाची लागवड आणि उत्पादकता याविषयी काहिशी चिंता असेल. या सर्व कारणांमुळे कापूस बाजारात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

source : agrowon

kapus bhav today, kapus bhav today maharashtra, कापूस भाव आजचा महाराष्ट्र, कापूस मार्केट

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top