कृषी महाराष्ट्र

Kharif Seed Supply : नांदेड येथे खरीप पिकांचे बियाणे उपलब्ध

Kharif Seed Supply : नांदेड येथे खरीप पिकांचे बियाणे उपलब्ध

Kharif Seed

Nanded News : परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित आणि विद्यापीठाच्या प्रक्षेत्रांवर उत्पादित करण्यात आलेल्या प्रमुख खरीप पिकांचे बियाणे नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र येथे उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे परभणी येथे विद्यापीठात जाणे टळणार आहे.

माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात विविध पिकांचे बियाणे उपलब्ध आहे. यात सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग आदी पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे. सोयाबीनचा ‘एमएयूएस १६२’ हा वाण उपलब्ध आहे. हा कंबाईन हार्वेस्टर यंत्राद्वारे काढणीस उपयुक्त राज्यातील एकमेव वाण आहे. १००-१०५ दिवसांत हा वाण तयार होतो.

याच्या शेंगा पक्वतेनंतर १०-१२ दिवस फुटत नाहीत. सोयाबीन ‘एमएयूएस १५८’ हा वाण चक्री भुंगा, खोडमाशी व शेंगा पोखरणारी अळी या किडी तसेच शेंगांवरील करपा व पानावरील ठिपके रोगांना सहनशील असणारा अधिक उत्पादनक्षम वाण आहे. सोयाबीनच्या दोन्ही वाणांच्या पिशवीचे वजन २६ किलोग्रॅम आहे. याची किंमत ३९०० रुपये आहे.

तुरीचा ‘बीएसएमआर ७३६’ हा मर आणि वंध्यत्व रोगास रोगास प्रतिकारक असणारा १७५-१८० दिवसांत तयार होणारा, लाल रंगाचे दाणे असणारा व आंतरपीक पद्धतीसाठी योग्य असणारा वाण आहे. ज्वारीचा ‘परभणी शक्ती’ हा लोह व जस्ताचे प्रमाण अधिक असणारा वाण आहे. Kharif Seed Supply

या वाणाच्या पिशव्यांचे वजन ४ किलोग्रॅम असून, एका पिशवीची किंमत ४०० रुपये आहे. मुगाचा ‘बीएम २००३-२’ हा वाण एकाच वेळी काढणीस येणारा, भुरी रोगास प्रतिबंधक, टपोरे चमकदार दाणे असणारा हा ६५-७० दिवसांत तयार होणारा वाण उपलब्ध आहे.

याच्या सहा किलोच्या पिशवीची किंमत १०८० रुपये आहे. हे बियाणे कापूस संशोधन केंद्र, देगलूर रोड, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत विक्री करण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे सहयोगी संचालक डॉ. के. एस. बेग यांनी केले

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top