कृषी महाराष्ट्र

Cotton Prices : जागतिक उत्पादन घटणार ! कापूस यंदा चांगलाच भाव खाणार

Cotton Prices : जागतिक उत्पादन घटणार ! कापूस यंदा चांगलाच भाव खाणार

 

Cotton Prices : पुणे : मागच्या हंगामात हिरमोड झाल्यानंतर यंदा सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा नसतानाही सरकी लावावी लागली. मागच्या वर्षी सारख यावर्षी पण भाव लागणार नाही याची भीती प्रत्येकालाच आहे. त्यात पाऊस पण कमी पडतोय. जगातील महत्वाच्या देशांमधील कापूस उत्पादनही यंदा कमी राहणार आहे. त्यामुळे कापूस बाजाराला यंदा चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे.

जागतिक पातळीवर यंदा कापसाचं उत्पादन घटणार आहे. अस कोण बोलल ? तर अमेरिकेचा कृषी विभाग म्हणजेच युएसडीएनं. त्यांनी सांगितलं कि जागतिक कापूस उत्पादन ६ टक्क्यांनी कमी राहील. पण जागतिक उत्पादन का घटणार? तर यंदा महत्वाच्या चीन, भारत, अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्ये कापूस पिकाला फटका बसला. सोप्या भाषेत सांगयचं झालं तर या चार देशांचा जागतिक कापूस उत्पादनातीव वाटा ७० टक्के आहे.

जगात चीन कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. चीनला कापूसही जास्त लागतो. त्यानंतर भारतात उत्पादन होतं. आपलीही कापसाची गरज वाढली. पण यंदा चीनचं कापूस उत्पादन १२ टक्क्यांनी कमी होणार आहे. पण चीनला कापूस मात्र गेल्यावर्षीपेक्षा जास्त लागेल. आपलं बोलयाचं झालं तर आपलंही उत्पादन २ टक्क्यांनी कमी होणार पण आपला कापूस वापर मात्र ४ टक्क्याने वाढणार आहे. Cotton Prices

बरं फक्त चीन आणि भारतात कापूस उत्पादन कमी झालं तर अमेरिका आणि ब्राझीलच्या कापसानही नांगी टाकली. थोडक्यात काय तर जगाला ७० टक्के कापूस पुरवणाऱ्या देशांचं उत्पादन यंदा कमी होणार. बरं या देशांमधील उत्पादन का घटणार? तर त्यांचं आणि आपलं कारण एकच. कमी पाऊस. चीनमध्ये तर १०० वर्षातील विक्रमी उष्णता होती. अमेरिकेत आपल्यासारखाचं पाऊस दडून बसला. यामुळे कापूस उत्पादन घटणार आहे. उत्पादनच कमी राहणार म्हणजे आतापासून भाव वाढले, असंही म्हणता येईल.

आपलं पण खरं दुखण आहे ते पाऊसच. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत पाऊसच नाही. त्यातच सणांसाठी कापसाला मागणी वाढली. त्यामुळं कापसाचे भाव वाढले. कापसाला सध्या ७ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय. Cotton Prices

जागतिक कापूस उत्पादनाचा अंदाज आणि पाऊसमानची स्थिती पाहू यंदा कापूस भाव चांगले राहतील, अशी शक्यता आहे. भाव चांगले राहतील म्हणजेच सतत वाढतच राहतील असं नाही. कापूस बाजारावर अनेक घटक परिणाम करत असतात. त्यामुळं बाजारभाव कमी जास्त होतात. मग तुम्ही म्हणाल विक्रीचा निर्णय कसा घ्यायचा? आपल्याला अनेकदा वाटतं भाव वाढतील भाव वाढतील. पण अचानक एखाद्या कारणानं भाव कमी होतात. किंवा आपण कापूस विकतो आणि भाव वाढतो. या दोन्ही वेळेला आपल्याला पस्तावा होतो.

मग काय कराणं सोयीस्कर ठरू शकतं. त्यासाठी आधी आपला उत्पादन खर्च काढा. आपल्याला एक क्विंटलसाठी किती खर्च आला हे काळालं की गिणत सोप होतं. त्यानंतर वेगवेगळ्या संस्था, सल्लागार, अभ्यासक हंगामातील भावाचे अंदाज देत असतात. यानुसार आपल्याला कापूस किती भावाने विकायचा हे ठरवावं. हा भाव आला की एक माल टप्प्याटप्प्यानं विकावा. टप्प्याटप्प्यानं यासाठी कारण भावात सतत चढ उतार होत असतात. आपण सगळाच माल उचांकी भावात विकण्यासाठी थांबलो आणि भाव कमी झाले तर नुकसान होऊ शकतं. त्यामुळं मालाचे टप्पे करून विकणं फायदेशीर ठरतं.

आता पुन्हा बाजारभावाकडं येऊ… यंदा देशातलं उत्पादन कमी राहणार आहे. किती कमी पाहणार? हे आताच सांगता येणार नाही. कारण पावसाचं काही खरं दिसत नाही. सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा बरसतो? परतीचा पाऊस कसा राहतो? पिकाला द्यायला विहीरीत पाणी राहत की नाही? यावरून उत्पादन ठरणारं आहे. पण यंदा सर्व काही आलबेल नाही हे आपण आताच सांगू शकतो. उत्पादनाचे अंदाज काय येतील? भावपातळी वेळोवेळी कशी बदलणार याची माहिती आम्ही तुम्हाला सांगत राहूच. त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सब्सक्राईब करा. यामुळं तुम्हाला माहिती लवकर मिळेल. Cotton Prices

source : agrowon

Cotton Rate, Cotton Market Price, Cotton Market Update, Cotton Prices, Cotton Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top