कृषी महाराष्ट्र

Pomegranate Season : मृग बहरातील डाळिंब बहरले ! वातावरणातील बदलांमुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव

Pomegranate Season : मृग बहरातील डाळिंब बहरले ! वातावरणातील बदलांमुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव

 

Pomegranate Season : देशातील यंदा सुमारे ४० हजार हेक्टरवर मृग बहर शेतकऱ्यांनी धरला आहे. यंदा डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या राज्यात पुरेसा पाऊस आणि पोषक वातावरण राहिल्याने पीक चांगले बहरले आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून वातावरणातील बदलांमुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक संकटात सापडले आहेत. Pomegranate Season

देशात गेल्या तीन वर्षांपूर्वी सुमारे ५० ते ६० हजार हेक्टरवर मृग बहर धरला जायचा. मात्र फुलकळी आणि फळ आकार मोठा झाला की अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस या साऱ्यांमुळे हातातोंडाशी बागेवर तेलकट, करपा आणि फळकुजवा या रोगांचा

प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान झाले. परिणामी, डाळिंब उत्पादकांनी हंगामात बदल केला. त्यामुळे गेल्या वर्षापासून मृग बहरातील डाळिंबाच्या क्षेत्रात १० ते २० हजार हेक्टरने घट झाली असल्याचा अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे. Pomegranate Season

यंदा देशात डाळिंबाचा अंदाजे ४० हजार हेक्टरवर मृग बहर धरला आहे. हंगामाच्या सुरुवातीला पाण्याची कमतरता भासली, परंतु पाण्याची उपलब्धता करून बहर उत्तमरीत्या साधला आहे. डाळिंबाला पुरेसा पाऊस आणि पोषक वातावरण असल्याने काडी चांगली तयार होण्यास मदत झाली. त्यामुळे फुलकळी चांगली निघाली. फुलाचे सेटिंगही चांगले झाले. मात्र सेटिंग होण्यास विलंब झाला. सध्या १०० ग्रॅम पासून २०० ग्रॅम आकाराची फळे लागली आहेत.

दरम्यान, वातावरणात बदल होऊ लागला आहे. त्यामुळे या बदलाचा फटका डाळिंबावर होण्यास सुरुवात झाली आहे. डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येऊ लागला आहे.

यंदा देशातील डाळिंबाला पोषक वातावरण असल्याने पीक चांगले आहे. गुजरातमध्ये पावसाने डाळिंबाचे नुकसान झाले आहे. राजस्थानमधील डाळिंब पिकाची स्थिती चांगली आहे. – प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ … वातावरणात बदल होऊ लागला आहे. या बदलत्या वातावरणाचा फटका डाळिंबावर होऊ लागला आहे. सध्या तेलकट रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
– विजय मरगळे, डाळिंब उत्पादक, तडवळे, ता. आटपाडी

नोव्हेंबरमध्ये येणार विक्रीस डाळिंब सर्वसाधारणपणे गणपती उत्सवानंतर काढणीस येतात. परंतु पाऊस आणि पाण्याच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी मृग बहर धरण्याचे नियोजन मागे पुढे केले आहे. त्यामुळे यंदा नोव्हेंबरमध्ये डाळिंब विक्रीस येण्याची शक्यता आहे. यंदाही डाळिंबाला चांगले दर मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

source : agrowon

Pomegranate Season

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top