कृषी महाराष्ट्र

Cotton Production : कापसाचे उत्पादन हे वाणावर नव्हे तर व्यवस्थापनावर अवलंबून ! वाचा संपूर्ण

Cotton Production : कापसाचे उत्पादन हे वाणावर नव्हे तर व्यवस्थापनावर अवलंबून ! वाचा संपूर्ण

Cotton Production

Jalna News : कापसाचे उत्पादन वाणावर नव्हे तर व्यवस्थापनावर अवलंबून असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख तथा सहयोगी संचालक संशोधन व विस्तार कृषी विद्यापीठ डॉ. सूर्यकांत पवार यांनी व्यक्त केले.

अॅग्रो इंडिया गटशेती संघाचा २२१० वा द्वादश कार्यक्रम शुक्रवारी (ता. १७) गाडेगव्हाण (ता. जाफराबाद) येथे पार पडला. या कार्यक्रमात कापूस, सोयाबीन तसेच फळबाग लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहयोगी संचालक संशोधन तथा विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. पवार बोलत होते. या वेळी गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे, नुजिविडू सीड्स कापूस पैदासकार डॉ. एस. एस. माने, कृषी महाविद्यालय दहेगावचे प्राचार्य एस. एस. बैनाडे, गहू पैदासकार प्रा. सय्यद मुझफ्फर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला न्याहरी व शिवार फेरी देलेगव्हण (ता. भोकरदन) येथे पार पडली.

या वेळी डॉ. पवार व इतर तज्ज्ञांनी शेतकरी संतोष बोर्डे यांच्या शेतात प्लॅस्टिक मल्चिंगवर कापूस पिकाची पाहणी केली. डॉ. पवार म्हणाले, की जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची निवड करावी. एकाच वाणाचा आगहा धरू नये. कोरडवाहू कपाशीसाठी १५०-१६० दिवसाचे वाण निवडावे. बेसल डोसचा वापर करावा.

पेरणी योग्य म्हणजे ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय म्हणजे पुरेसा ओलवा झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला दिला. कपाशीच्या पिकासाठी ठिबकचा वापर करावा. सोयाबीनमध्ये घरचे बियाणे उगवण क्षमता व बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. सोयाबीन, तूर, बाजरी पिकाचा पीक पद्धतीत सामावेश करावा. बीबीएफ रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करण्याविषयी मार्गदर्शन केले. Cotton Production

डॉ. बैनाडे व डॉ. माने यांनी कापूस पिकातील सघन लागवड विषयी मार्गदर्शन केले. डॉ. कापसे यांनी गटशेती व आंबा मोसंबी डाळिंब लागवडीविषयी मार्गदर्शन केले. त्यासाठी रोपांची निवड, अंतर खत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानचा काटेकोर पणे वापर करावा. या वेळी करटूले लागवडविषयी भगवान बनकर यांनी महिती दिली. कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top