कृषी महाराष्ट्र

Crop Loan : शेतकऱ्यांची पिक कर्जे होणार माफ ! राज्य शासनाचा निर्णय

Crop Loan : शेतकऱ्यांची पिक कर्जे होणार माफ ! राज्य शासनाचा निर्णय

 

Loan waiver | राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट, 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकन्यांचे पीक कर्ज (Loan waiver) माफ करण्यात येणार आहे. यासाठी योजनेअंतर्गत आतापर्यंत 52,512.00 लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी र 50 लाख इतका निधी उपलब्ध आहे. त्याअनुषंगाने सहकार आयुक्त, पुणे यांनी 23.06.2023 च्या पत्रान्वये सदर योजनेसाठी 50 लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत आता निर्णय घेण्यात आला आहे. Crop Loan

शासन निर्णय

सन 2023-24 या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. 50.00 लाख एवढा निधी राज्यात जुलै, 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य 33 अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. Crop Loan

शेतकऱ्यांची होणारं कर्जमाफ

सदर खर्च मागणी इतर कृषीविषयक कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून करण्यात येणार आहे. याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्यासह सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त उपनिबंधक अंदाज व नियोजना, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.

source : mieshetkari

Crop Loan

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top