आता सहज मिळणार पीक कर्ज, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश : वाचा संपूर्ण
मिळणार पीक कर्ज
Crop Loan | शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेकदा शेतकऱ्यांना (Agriculture) पीक कर्ज घ्यावे लागते. मात्र, ते घेत असताना जाचक अटींचा सामना करावा लागतो. याच अटींमुळे शेतकऱ्यांना सहज पीक कर्ज (Crop Loan) मिळत नाही. यासाठी शेतकऱ्यांना अनेक अटी शर्तींची पूर्तता करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांना लवकर पीक कर्ज (Loan) मिळत नाही. त्यामुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेऊन एक जाचक अट रद्द करण्यासाठी तात्काळ बैठक बोलावण्याचे निर्देश दिले आहेत.
जाचक अट रद्द करण्याचे निर्देश
देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची पीक कर्ज (Crop Insurance) मिळवण्यासाठी करावा लागणारा अडचणींचा सामना दूर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या (Department of Agriculture) हिताचा निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. पीक कर्ज घेताना जाचक असणारी सिबिल अट (Crop Loan CIBIL Condition) ही रद्द करण्यात यावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एसएलबीची बैठक तात्काळ बोलवावी याबाबत निर्देश दिले आहेत.
तात्काळ बैठकीचे निर्देश
कृषी कर्जाला (Agricultural Loan) सी-बिल लागणार नाही, यासाठी तात्काळ एसएलबीसीची बैठक घेण्यात यावी, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना (Agricultural Information) याचा मोठा फायदा होणार आहे. हे निर्देश देतानाच कृषिपंप सौर उर्जेवर आणण्याच्या योजनेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विज तोडणीबाबत म्हणाले..
शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये, असे लेखी आदेश काढण्यात आले आहेत. इतर केंद्र सरकारशी संबंधित विषयांवर केंद्र सरकारसोबत तुमची बैठक आयोजित करण्यात येईल, कारण गेल्यावेळी अशाच बैठकीचा चांगला लाभ झाला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.
source : mieshetkari.com