कृषी महाराष्ट्र

Farm Pond Subsidy : माघेल त्याला शेततळे अनुदानात वाढ !

Farm Pond Subsidy : माघेल त्याला शेततळे अनुदानात वाढ !

 

सातारा : मागेल त्याला शेततळे योजना (Farm Pond Scheme) पुन्हा सुरू झाली आहे. आता शेततळे (Farm Pond) खोदण्यासाठी गुंठ्यानुसार २५ ते ७५ हजार रुपयांचे अनुदान (Farm Pond Subsidy) मिळणार आहे. मागील योजनेच्या तुलनेत त्यात तब्बल २५ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

या योजनेतून जिल्ह्यात ६०० शेततळ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. जुन्या योजनेत बदल करून ही नवीन सोडत पद्धतीने शेततळे वैयक्तिक स्वरूपात दिली जाणार आहेत.

जुन्या योजनेतील त्रुटी दूर करून ही नवीन योजना पुन्हा सुरु केली आहे. यामध्ये अनुदानापासून नियमावलीतही बदल केले आहेत. जेणे करून जास्तीत जास्त शेतकरी यामध्ये सहभागी होऊ शकतील. यामध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रथम स्वत: खर्च करून शेततळे घ्यावे लागेल. त्यानंतर तपासणी होऊन टप्प्याटप्प्यांमध्ये हे पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जातील.

शेततळे मागणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर किमान दीड एकर जमीन असणे आवश्यक आहे. जमीन शेततळे खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अडीच ते १२ गुंठ्यापर्यंत क्षेत्रात शेततळे करता येईल. २५ हजारांपासून ७५ हजारांपर्यंत अनुदान असेल. शेतकऱ्यांना महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक असेल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड केली जाईल.

अस्तरीकरणासाठी स्वतंत्र योजना

जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ५५, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दोन, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५४३ शेततळ्यांचा समावेश आहे. त्यामुळे इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत.

जिल्ह्याला मंजूर उद्दिष्टाच्या ३० टक्के निधी महिला खातेदार शेतकऱ्यांसाठी, तर पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असेल. शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी स्वतंत्र योजना आहे. त्यासाठीही गुंठ्याप्रमाणे रक्कम मिळेल. त्यामध्ये २५ हजारांपासून ७५ हजारांपर्यंत अनुदान असेल.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top