कृषी महाराष्ट्र

हवामान अंदाज : पुढील ४ दिवसाचे पिक निहाय हवामान अंदाज

हवामान अंदाज : पुढील ४ दिवसाचे पिक निहाय हवामान अंदाज

 

Agricultural Advice | शेतकरी मित्रांनो पुढच्या चार दिवसांसाठी हवामान (Weather) आधारित पीक निहाय कृषी सल्ला (Department of Agriculture) काळजीपूर्वक वाचून पिकाची काळजी घ्यावी.

कृषी सल्ला

• परिपक्व अवस्थेतील धान पिकाची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
• कपाशीमधील (Cotton Rate) दहिया रोग व पानावरील ठिपके रोगाच्या व्यवस्थापनासाठी अझॉक्सिस्ट्रो बिन 18.2 % डब्ल्यू/डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल 11.4 % डब्ल्यू/डब्ल्यू एससी 10 मिली किंवा क्रेसॉक्सिम-मिथाइल 44.3 एसस 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
• ज्या भागात कापूस पिक (Cotton crop) पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे.
• तेथे शेतकरी (Type of Agriculture) बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे.
• वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या
आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा.
• कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान
टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा.

तूर

तूर पिकाला कळ्या आणि फुले लागताच कीड व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5 टक्के निंबोळी अर्क अॅकझाडीराक्टिन 300 पीपीएम 50 मिली अधिक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी. पाने खाणाऱ्या अळीच्या निरीक्षणासाठी हेक्टरी ५ फेरोमेन सापळे 50 मी. अंतरावर लावावे. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत
असल्यास क्लोराँट्रा निलिप्रोल 18.50 % एससी 150 मिली प्रती 500 ते 750 लिटर पाणी प्रती हेक्टर फवारणी करावी.

सूर्यफूल

सूर्यफूल पिकामध्ये उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करावी आणि एका ठिकाणी एकच जोमदार
रोपटे ठेवावे.

कापूस

ज्या भागात कापूस पिक पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे. तेथे शेतकरी
बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान
टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीमधील दहिया रोग व्यवस्थापनासाठी अझॉक्सिस्ट्रो बिन 18.2 % डब्ल्यू/डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल 11.4 % डब्ल्यू/डब्ल्यू एससी 10 मिली किंवा क्रेसॉक्सिम-मिथाइल 44.3 एसस 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वांगे

वांग्याच्या पिकावर फळे व शेंडा पोखरणाऱ्या अळीचा रादुर्भाव दिसून आल्यास व आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास कार्बोसल्फान 25 % ईसी 1250 मिली प्रति हेक्टर किंवाडेल्टामेथ्रिन 02.80% ईसी 400 ते 500 मिली प्रति हेक्टर किंवाइमामेक्टिन बेंझोएट 05% एसजी 200 ग्रॅम प्रति हेक्टर किंवालॅम्बडा-सायहॅलोथ्रीन 04.90 % सीएस 300 मिली प्रति हेक्टर किंवास्पिनोसॅड 45% एससी 162 ते 187 मिली प्रति हेक्टर किंवाथियाक्लोप्रिड 21.70 % एससी 750 मिली प्रति हेक्टर किंवाक्लोराँट्रा निलिप्रोल 09.30% + लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन 04.60 % झेडसी 200 मिली प्रति हेक्टर या प्रमाणात 500 लिटर पाण्यात मिसळून कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.

मिरची

तापमानातील चढ उतार व उच्च आद्रतेमुळे मिरची पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी हेक्साकोनाझोल 75 % डब्ल्यूजी 66.7 ग्राम ग्रॅम किंवा टेब्युकोनाझोल 25% डब्ल्यूजी @ 500-750 ग्रॅम किंवा अझॉक्सीस्ट्रो बिन 8.3 % + मॅन्कोझेब 66.7 % डब्ल्यूजी @ 1500 ग्रॅम येवढ्या प्रमाणात प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यात फवारणी करावी.

source : mieshetkari.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top