वेलवर्गीय भाजीपाला लागवड माहिती – दोडका, कारली, दुधी भोपळा
वेलवर्गीय भज्यामध्ये प्रामुख्याने काकाडी, कारली, दुधी, भोपळा व घोसळी या प्रमुख भाज्याचा समावेश होतो. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे दर्जेदार आणि चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन मिळवण्याकरीता वेलाला मंडप किंवा तारेचा ताटीचा आधार देता येतो. वेलींना जर चांगला आधार मिळाला तर त्याची वाढ चांगली होते.
आधारासाठी मंडप व ताटी पद्धत
वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यामुळे फळे जमिनीपासून ४ – ६ फुट उंची वर वाढतात. फळे लोंबकळत राहत असल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्य प्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळाचा रंग सारखा आणि चांगला राहतो. फळांची तोडणी, औषधं फवारणी ही कामे सुलभ होतात.
मंडप उभारणी –
१ ) मंडप उभारणी करतांना डबांचा वापर करतात डबा कुजणार नाही यासाठी डबांचा जो भाग जमिनीत गाडला जाईल त्यावर डांबर लावावे.
२ ) मंडप पद्धती मध्ये दोन ओळीतील अंतर १० ते १२ फुट आणि दोन वेलीतील अंतर तीन फुट ठेवावे.
३ ) २० ते २५ फुट अंतरावर पाट बांधणी सुतळीने करावी. सुतळीचे एक टोक वेलाचा खोळा जवळ काठीच्या आधाराने बांधावे तर दुसरे टोक तारेस बांधावे.
४ ) वेलची वाढ ५ फुट होईपर्यंत वेलाची बगलफुट व ताणवे काढावे. मुख्य वेल मंडपावर पोचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा.
हवामान व जमीन –
भोपळा, कारली, काकाडी या सर्व वेलवर्गीय पिकांना उष्ण आणि कोरडे हवामान पोषक असते. या वेलवर्गीय पिकांना मध्यम ते भारी योग्य पाण्याचा निचरा होणारी जमिनीची निवड करावी.
पाणी व्यवस्थापन –
पिकांची उगवणी वेळेस जमीन ओलवावी तसेच उगवल्यावर ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाळी पाळीणे पाणी द्यावे.
पिकांची नावे | हंगाम | सुधारित जाती | बियाणे | प्रमाण हेक्टरी (kg) | पिकांचा कालावधी (दिवस) | उप्तादन( टन ) |
कारले | एप्रिल – जून | को-लॉंग व्हाईट | फुले ग्रीन गोल्ड | २-२.५ | १८०- १८०-२०० | २०-२५ |
दुधी भोपळा | मार्च | सम्राट,नवीन पुसा समर | प्रोलीफिक लॉग | १-१५ | १००-१२० | १५-२० |
काकडी | जानेवारी | पुन खीर,हिमांगी | फुले शुभांगी पोन सेंट | १-१५ | १००-१२० | १५-२० |
दोडका | कारल्या पेक्षा १० ते १५ दिवस उशिरा | पुसा न्सदार | कोकण हरित फुले सुचेता | २-२.५ | ४१०-१५०० | १५-२० |
तांबडा भोपळा अरका सुर्यमुखी, अरक
काढणी-
फळे कोवळी असतानाच काढणी करावी म्हणजे बाजारभाव चांगला मिळतो. वेलवर्गीय भाजीपाला
सर्वसाधारणपणे कारली, दोडका, घोसाळी, वाल, काकडी या पिकांसाठी ताटी पद्धतीचा; तर दुधी भोपळ्यासाठी मंडप पद्धतीचा वापर करावा. पारंपरिक पद्धतीपेक्षा या सुधारित पद्धतीमुळे उत्पादनात वाढ मिळते. दोन ओळींतील अंतर जास्त असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने आंतरमशागत करणे सुलभ होते. ताटी अथवा मंडप पद्धतीमुळे भरपूर सूर्यप्रकाश खेळता राहतो, त्यामुळे फळांची प्रत सुधारते. वेलीवर कीटकनाशक अथवा बुरशीनाशकाची फवारणी करणे सुलभ होते. उत्पादनात अंदाजे 20 ते 25 टक्के वाढ होते. फळांची तोडणी करणे अतिशय सोईस्कर होते.
दोडका, कारली, दुधी भोपळा लागवडीसाठी मध्यम काळी, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी शेताची चांगली मशागत करून हेक्टरी 15 टन शेणखत मिसळावे. खरिपातील लागवड जून-जुलै, तर उन्हाळी लागवड जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात करावी. लागवडीसाठी दोडक्याच्या पुसा नसदार, कोकण हरिता, फुले सुचिता; तर कारल्याच्या फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी आणि दुधी भोपळ्याच्या सम्राट या जातीची निवड करावी. कारली आणि दोडका लागवडीसाठी ताटी पद्धतीचा अवलंब करावा. लागवडीचे अंतर 1.5 मीटर x 1 मीटर ठेवावे. दुधी भोपळ्याची मंडप पद्धतीने लागवड करताना 3 मीटर x 1 मीटर अंतर ठेवावे. जमिनीवर लागवड करताना 5 मीटर x 1 मीटर अंतर ठेवावे. लागवडीसाठी दोडका, कारले आणि दुधी भोपळ्याचे दोन ते 2.5 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
संपर्क – 02426 – 243242
अखिल भारतीय भाजीपाला सुधार प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
संदर्भ :- mr.vikaspedia.in