कृषी महाराष्ट्र

पी एम किसान योजनेच्या आधार सीडिंगसाठी २५ मेपर्यंत डेडलाइन ! वाचा सविस्तर

पी एम किसान योजनेच्या आधार सीडिंगसाठी २५ मेपर्यंत डेडलाइन ! वाचा सविस्तर

पी एम किसान

Pm Kisan Yavatmal News : केंद्र शासनानंतर राज्य शासनाने पीएम किसान योजना राबविण्याची घोषणा केल्यानंतर याची अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी व आधार सीडिंग करणे महत्त्वाचे होते.

अजूनही जिल्ह्यातील जवळपास ३६ हजार शेतकऱ्यांनी आधार सीडिंग केले नसून, २५ मे ची डेडलाइन शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

केंद्र शासन दरवर्षी शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत करते. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य शासनानेही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदतीचे आश्‍वासन दिले होते. Pm Kisan Scheme

शेतकऱ्यांना आधार म्हणून राज्य शासन मदत करणार आहे. यानंतर योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. योजनेसाठी शेतकऱ्यांनी बँक खात्याची ई-केवायसी व आधार सीडिंग करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे आधार सीडिंग व ई-केवायसी झाली आहे. अजूनही जिल्ह्यातील ३६ हजार ८०६ पात्र शेतकऱ्यांचे ई-केवायसी व आधार सीडिंग झालेले नाही. त्यामुळे आता या शेतकऱ्यांचे ई-केवायसी करण्याची जबाबदारी बँकेला देण्यात आली आहे. PM Kisan Yojana

२५ मेपर्यंत शेतकऱ्यांचे आधार सीडिंग करावे लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ३६ हजार शेतकऱ्यांपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक २५ हजार २८० शेतकरी शिल्लक आहेत. या शेतकऱ्यांचे आधार व ई -केवायसी झालेली नाही.

शासनाने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून माहिती मागितली आहे. ज्या बँकेचे आधार सीडिंगच्या कामांची गती कमी आहे. अशा बँकांनी वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. पी एम किसान

source :agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top