कापसाच्या भावाबाबत पंधरा दिवसांत निर्णय : गिरीश महाजन
कापसाच्या भावाबाबत
Jalgaon News : कापूस दराबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे, शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस पडून आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. भाव वाढवून देण्याबाबत आपण कॅबिनेटमध्येही प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रांकडे त्याचा पाठपुरावा सुरू आहे.
त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत कापूस दराबाबत निर्णय होईल, असे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. जळगाव येथे येत्या दोन महिन्यांत पोलिस आयुक्तालय करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रांतील सरकारला व नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकालाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. महाजन बोलत होते. Cotton Market
आमदार रणधीर सावरकर, खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, मनोज भांडारकर आदी या वेळी उपस्थित होते. श्री. महाजन म्हणाले, की जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना लक्षात घेता, जिल्ह्यात पोलिस आयुक्तालय उभारण्याबाबत आपण आग्रही आहोत.
हे पण वाचा : Cotton Rate : राज्यात कापूस दरात काहीशी सुधारणा ! वाचा सविस्तर
त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावाही करीत आहोत. त्याला लवकरच मंजुरी मिळून येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यात पोलिस आयुक्तालय उभारण्यात येईल. कापूस दराबाबत महाजन म्हणाले, की कापसाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. Cotton Market
अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. आपण याकडे लक्ष देऊन आहोत. कॅबिनेटमध्येही याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्राकडेही पाठपुरावा करीत आहोत. येत्या पंधरा दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खेळाडूंचे आंदोलन
दिल्लीतील कुस्ती खेळाडूंच्या आंदोलनाबाबत बोलताना महाजन म्हणाले, की दिल्लीतील कुस्ती खेळाडूंचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. ही बाब अत्यंत गुंतागुतीची झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यात लक्ष घालून चौकशी करतील. पंतप्रधान मोदी यांचे गेल्या नऊ वर्षांतील कामही अत्यंत चांगले आहे. जनताभिमुख निर्णय त्यांनी घेतले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
source : agrowon