कृषी महाराष्ट्र

Cotton Rate : राज्यात कापूस दरात काहीशी सुधारणा ! वाचा सविस्तर

Cotton Rate : राज्यात कापूस दरात काहीशी सुधारणा ! वाचा सविस्तर

Cotton Rate

Cotton Bajarbhav : बाजारातील कापूस आवक आजही सरासरीपेक्षा जास्त होती. काही भागात शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केली. त्यामुळे कापसाच्या सरासरी भावात काही ठिकाणी सुधारणा दिसली.

तर बहुतेक ठिकाणी दरपातळी स्थिरावली होती. कापसाला आज सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता.

मागील दोन दिवसांपासून कापसाच्या दरात काहीसे चढ उतार दिसत आहेत. तर सरासरी दरपातळीही काहीशी वाढली.

कापसाची बाजारातील आवक आजही सरासरीपेक्षा अधिकच होती. याचा दबाव दरावर आहेच. शिवाय अनेक भागात पाऊस होत असल्याने शेतकरीही कापसाची विक्री करत असल्याचं सांगितलं जातं. देशातील काही भागात कापसाची आवक कमी झालेली दिसते.

पण एकूण देशभरातील आवक आजही सरासरीपेक्षा जास्त आहे. आज देशभरातील बाजारांमध्ये १ लाख ८ हजार गाठींची आवक झाली.

आवकेचा दबाव असल्याने दरावरील दबाव कायम दिसतो. पण सरासरी दरपातळी काहीशी वाढली. काही भागांमध्ये आज कापसाच्या भावात क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंतची सुधारणा दिसली. तर बहुतेक ठिकाणी कापसाचे भाव स्थिर होते.

हे पण वाचा : तुरीने गाठला १० हजारांचा टप्पा ! वाचा सविस्तर

कापसाला आज सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. फरदड कापसाला आजही ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आजही गुजरातमध्ये सर्वाधिक आवक होती. त्यानंतर महाराष्ट्रातील बाजारात कापूस आला. आवकेचा दबाव आणि पावसाळी वातावरणाचा परिणाम बाजारावर दिसतो. Cotton Market

वायद्यांवर कशाचा दबाव ?

महिन्याचा शेवट असल्याने वायद्यांमध्ये कापूस भावात नरमाई दिसली. वायदे जून महिन्याचे वायदे ३४० रुपयांनी कमी होऊन ५८ हजार ६४० रुपयांवर आले होते. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारातही वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच होते.

कापूस वायदे ८३.५९ सेंट प्रतिपाऊंडवर होते. वायद्यांमद्ये नरमाई दिसत असली तरी प्रत्यक्ष कापूस खरेदीचा सरासरी भाव म्हणजेच काॅटलूक ए इंडेक्स ३ सेंटने वाढून ९४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचला होता.

सरकीचे भावही दबावात

कापसाबरोबरच सरकीचे भावही कमी झाले आहेत. सरकीचे भाव आज सरासरी २ हजार ९०० ते ३ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. सरकीला सध्या सरकी तेलाचा फटका बसत आहे. खाद्यतेलाचे भाव पडल्याने सरकी तेलही कमी झाले. तसेच तेलबिया पेंडेचे भावही नरमले आहेत. परिणामी सरकी तेल आणि सरकी पेंडेमुळे कापसावर दबाव वाढला.

पुढचा अंदाज काय ?

मागील दोन दिवसांपासून काही बाजारांमध्ये कापसाच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. अनेक बाजारात दराने ७ हजारांचा टप्पा पुन्हा पार केला. तर काही ठिकाणी ७ हजार ५०० रुपयांचाही भाव पाहायला मिळाला. खरिपाची गरज भागल्यानंतर शेतकरी पुन्हा विक्री कमी करत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

तसेच शेतकऱ्यांकडील कापूस येत्या काही दिवसांमध्ये कमी होईल. परिणामी बाजारातील आवक मर्यादीत होऊन दरात सुधारणा दिसू शकते. तसेच पाऊस कसा होतो आणि कापूस लागवडीची काय स्थिती राहते, यावरही बाजार अवलंबून असेल, असे जाणकारांनी सांगितले.

source : agrowon

kapus bhav, kapus bhav today, कापूस भाव आजचा महाराष्ट्र, कापूस बाजार भाव, आजचे कापसाचे भाव, कापूस भाव आजचा, kapus bajar bhav today, kapus bhav a mravati today 2021, गुजरात कापसाचे भाव, आजचे बाजार भाव कापूस, कापसाचे आजचे भाव, कपाशी फवारणी औषध pdf, कापूस फवारणी वेळापत्रक, kapus bazar bhav, kapus bhav today maharashtra, कापूस मार्केट, kapus bazar bhav today maharashtra, कापसाचे भाव आजचे, kapus gathan, कापूस गठान भाव

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top