कृषी महाराष्ट्र

Tur Market Price : तुरीने गाठला १० हजारांचा टप्पा ! वाचा सविस्तर

Tur Market Price : तुरीने गाठला १० हजारांचा टप्पा ! वाचा सविस्तर

Tur Market Price

Tur Arrival Update : चालू हंगामात तुरीचे भाव सुरुवातीपासूनच तेजीत राहीले. गेल्या हंगामात हमीभावाचा टप्पाही न गाठणाऱ्या तुरीच्या दराने यंदा मात्र उचल घेतली. देशातील घटलेले उत्पादन, मर्यादीत आयात आणि चांगला उठाव यामुळे तुरीला चांगला भाव मिळत आहे. तुरीच्या दराने आता काही बाजारांमध्ये १० हजारांचा टप्पा गाठला.

चालू हंगामातील तूर बाजारात आली तेव्हा दर तेजीत होते. नवी तूर हाती येण्याच्या आधीच यंदा देशातील उत्पादन कमी असल्याचं स्पष्ट झालं होतं. गेल्या हंगामात तुरीला कमी भाव मिळाला होता.

हमीभावाचा टप्पाही न गाठणाऱ्या तुरीच्या दराने खरिपातील लागवड कमी झाल्यानंतर डोके वर काढले. नवा माल बाजारात येण्याच्या दोन महीने आधीच दारने हमीभावाचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. तूर आवकेच्या काळातही भावात नरमाई दिसली नाही.

सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण सरकारला यश आले नाही. सरकारने व्यापाऱ्यांना आपल्याकडील स्टाॅकची माहीती देण्याचे आदेश दिले. तसेच मुक्त आयात धोरण लागू केले. बाजारात पुरवठा वाढविण्यासाठी सुरुवातीला आयात तूर खेरदी केली. Tur Market

पण सरकारला १० हजार टनांचीही खेरदी करता आली नाही. आता सरकार देशातील आयातदार इतर देशांमध्ये तुरीचा स्टाॅक करत असल्याचे सांगत आहे. तसेच या स्टाॅकीस्टनी तूर तातडीने बाजारात आणवी, अशा सूचनाही केल्या.

दुसरीकडे भारताची मागणी पाहून म्यानमारमधील निर्यातदारांनी तुरीचे भाव वाढवले. तसेच निर्यात मर्यादीत केली. आफ्रिकेतील तूर आणखी पाच महिन्यानंतर आयात होऊ शकते. आफ्रिकेत आता तूर नसल्यात जमा आहे.

हे पण वाचा : पिकांना शिफारशीनुसार खतमात्रा कशी द्यावी ? वाचा संपूर्ण माहिती

फक्त म्यानमारमध्ये तूर उपलब्ध आहे. पण म्यानमारधील निर्यातदार आणखी भाव वाढण्याची वाट पाहत आहेत.

बाजारात तुरीचा पुरवठा मागणीपेक्षा अधिक असल्याने देशातील अनेक बाजारांमध्ये तुहीने १० हजारांचा टप्पा गाठला. १० हजारांचा भाव गुणवत्तापूर्ण मालाला मिळत आहे. तर सरासरी भावपातळी ८ हजार ५०० ते १० हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

बाजारात पुढील चार ते पाच महीने तुरीचा पुरवठा वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुरीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top