कृषी महाराष्ट्र

Today’s weather forecast : राज्यात वादळी पावसाचा इशारा ! वाचा सविस्तर

Today’s weather forecast : राज्यात वादळी पावसाचा इशारा ! वाचा सविस्तर

वादळी पावसाचा इशारा

Pune News : राज्याच्या कमाल तापमानात घट झाली असली, तरी विदर्भात उन्हाचा चटका कायम आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, आज (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले होते.

उर्वरित राज्यात तापमान ३४ ते ४१ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार होत असले, तरी उष्ण व दमट हवामानामुळे उन्हाच्या झळा आणि उकाडा कायम आहे.

नैॡत्य राजस्थान आणि परिसरावर, तसेच तेलंगणा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. आग्नेय मध्य प्रदेशापासून विदर्भ, रायलसीमा, तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. आज (ता. २९) उष्ण व दमट हवामानाबरोबरच आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे. Rain Update

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दक्षिण भागासह विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह, पावसाची शक्यता आहे.

रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.६ (२३.३), जळगाव ४१ (२६.६), धुळे ४०.५ (२३.५), कोल्हापूर ३४.६ (२३.५), महाबळेश्‍वर ३० (१७.६), नाशिक ३५ (२३.२), निफाड ३६.५ (२३), सांगली ३७.३ (२३.४), सातारा ३६.३ (२२.८), सोलापूर ३९.८ (२५.२), सांताक्रूझ ३४.२ (२७.६), डहाणू ३५.३ (२८.७), रत्नागिरी ३४.३ (२७)

छत्रपती संभाजीनगर ३८.४ (२३), नांदेड ४०.२ (२७.८), परभणी ४० (२७.१), अकोला ४१.२ (२७.९), अमरावती ४० (२४.९), बुलडाणा ३८.६ (२५), ब्रह्मपुरी ४१.३ (२४.१), चंद्रपूर ४३ (२६.८), गोंदिया ४१.६ (२३.४), नागपूर ४१.९ (२४.७), वर्धा ४१.४ (२६.५), वाशीम ४०.८(२४.४) यवतमाळ ४० (२५.२). (Rain Update)

मॉन्सूनची चाल मंदच

नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) १९ मे रोजी दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाले. मात्र त्यानंतर आठवडाभराहून अधिक काळ मॉन्सूनची चाल मंदावली आहे. रविवारी (ता. २८) मॉन्सूनच्या प्रगतीची स्थिती ‘जैसे थे’ आहे.

हे पण वाचा : Cotton Bajarbhav : कापूस बाजारावर पावसाच्या अंदाजाचा परिणाम दिसू शकतो का ?

दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा आणखी काही भाग, तसेच अंदमान बेटांच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती आहे.

वादळी पावसाचा इशारा

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर.

मराठवाडा : नांदेड, लातूर, धाराशिव

विदर्भ : अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

source : agrowon

Thunderstorm warning in the state

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top