कृषी महाराष्ट्र

Monsoon Update : राज्यात 10 जूनपर्यंत पावसाला सुरुवात होणार ! वाचा संपूर्ण

Monsoon Update : राज्यात 10 जूनपर्यंत पावसाला सुरुवात होणार ! वाचा संपूर्ण

Monsoon Update

सध्या सर्वांचे लक्ष पावसाकडे लागले असून पाऊस कधी आणि किती पडणार यावर शेतकऱ्यांची अनेक गणित अवलंबून आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांवर १९ मे पासून अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने २९मे रोजी वेग पकडला आहे.

यामुळे १५ जूनपासून देशातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सूनने २२ ते २६ मे या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे बंगालच्या उपसागरात सरकायला हवे होते.

परंतु तो ३१ मे रोजी त्या स्थितीत पोहोचला. त्यामुळे नेहमीपेक्षा एक आठवडा उशिराने अस्तित्व दाखवत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांची कामे पूर्ण करण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे.

मान्सूनचा वेग पाहता १ जूनला कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्य मोसमी पाऊस केरळ आणि तामिळनाडूमध्ये ५ जूनपर्यंत सुरू होईल, असा अंदाज आहे.

हे पण वाचा : अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस कसा असणार ? वाचा संपूर्ण

१० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहोचेल. १५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल.

२० जूनपासून राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरपर्यंत पाऊस पडेल. मान्सूनचा हा टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात पाऊस लवकरच सुरू होईल.

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top