भारतीय अंड्याला मागणी वाढली : दर वाढतील का ? वाचा सविस्तर
भारतीय अंड्याला मागणी
Egg Rate : जानेवारीत अंडी दरात सुधारणा झाल्यानंतर तेजी कायम राहण्याचा अंदाज होता. पण उत्पादन वाढल्यानं दर पुन्हा नरमले होते. आता मात्र टर्कीकडून अंडी निर्यात (Egg Export) घटल्याने भारताला निर्यातीची संधी निर्माण झाली.
पूर्व आशियातून भारतीय अंड्याला मागणी वाढली. त्यामुळे यंदा अंडी निर्यात १० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
जागतिक बाजारात अंडी निर्यातीत टर्की महत्वाची भुमिका पार पाडतो. पण मागील महिन्यात टर्कीत भुकंपाने होत्याचे नव्हते केले. याचा फटका येतील पोल्ट्री उद्योगालाही बसला. टर्कीतील अंडी उत्पादन घटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळं भारतातून अंडी निर्यात वाढली. Egg Rate
अंड्याला पूर्व आशियातून मागणी येत आहे. भारतातील महत्वाच्या अंडी उत्पादक नमक्कल भागातून निर्यात वाढली असून निर्यातीत किमान १० टक्के वाढ होण्याचा अंदाज निर्यातदार व्यक्त करत आहेत. देशातील एकूण अंडी निर्यातीपैकी नमक्कल भागातून तब्बल ९० ते ९५ टक्के निर्यात होत असते.
भारतातून एप्रिल ते जानेवारी या काळात पोल्ट्री उत्पादनाची निर्यात जवळपास दुप्पट झाली. कतारमध्ये फुटबाॅल विश्वचषकामुळे पोल्ट्री उत्पादनांना मागणी वाढली होती. त्यामुळं भारताच्या निर्यातीत कतारचा सर्वाधिक वाटा होता.
तर मलेशियाने भारताच्या पोल्ट्री उत्पादनांना आपली बाजारपेठ खुली केली. त्यामुळे मलेशियालाही निर्यात वाढली, असे वृत्त बिझनेसलाईनने दिले. टर्कीतून निर्यात घटल्याचा फायदा भारताला होतोय, असे ऑल इंडिया पोल्ट्री असोसिएशनचे सचिव विलासन परमेश्वरन यांनी सांगितले.
१०० कोटी अंडी निर्यात
टर्कीतून निर्यात घटल्याने भारताची निर्यात १० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. देशातून मागीलवर्षी १०० कोटी अंडी निर्यात झाली होती. फिफा विश्वचषकामुळे कतारने जवळपास १.५ कोटी अंडी आयात केली. तर मलेशियाला नुकतेच ५० लाख अंडी निर्यात झाली.
श्रीलंका आणि दुबईतूनही भारतीय अंड्याला मागणी येत आहे. भारतीय अंड्याचा मुख्य ग्राहक ओमान आहे. त्यानंतर मालदीव, युएई आणि कतारचा क्रमांक लागतो. भारतातून अंडी निर्यात वाढल्यास सध्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या उत्पादकांना चांगला दर मिळू शकतो. Egg Rate
टर्कीत नुकतेच भुकंप आला. त्यामुळे टर्कीतून पूर्व आशियात होणारी अंडी निर्यात थांबली. परिणामी भारतीय अंड्याला मार्केट खुले झाले. फेब्रुवारीपासून भारताकडे अंडी निर्यातीसाठी विचारणा होत असून आजही मागणी कायम आहे.
विलासन परमेश्वरन, सचिव, ऑल इंडिया पोल्ट्री असोसिएशन
source : agrowon