कृषी महाराष्ट्र

‘कर्जमुक्ती’ अंतर्गत बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी जमा ! वाचा संपूर्ण माहिती

‘कर्जमुक्ती’ अंतर्गत बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी जमा ! वाचा संपूर्ण माहिती

‘कर्जमुक्ती’ अंतर्गत

Ratnagiri News : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Mahatma Jotirao Phule Farmers Loan Waiver Scheme) २०२२-२३ या आर्थिक वर्षात १२ हजार ९८७ शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी २९ लाख रुपये जमा झाले आहेत. लाभ मंजूर असलेले २ हजार ७८३ शेतकरी अजून लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.

शेती व शेतीशी निगडित कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. काही भागांत अवेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने मागील काही वर्षांत शेती निगडित कर्जाची परतफेड होऊ शकली नव्हती. Crop Loan

परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकला होता. त्यामुळे त्यांना नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली होती.

पण, अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड नियमित केली होती पण त्यांना लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान देणारी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत योजना लागू केली.

२०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची पहिली, दुसरी व तिसरी यादी शासनाने जाहीर केली आहे.

त्यात १५ हजार ७६१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २२ हजार ८०४ शेतकऱ्यांनी प्रोत्साहन लाभासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत. त्यातील जाहीर झालेल्या तीन यादीतील मिळून १५ हजार ७६१ लाभार्थ्यांची नावे आली आहेत. Crop Loan

हा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आधार प्रमाणीकरण बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यास अनुदान थेट खात्यात जमा होते. यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांपैकी १५ हजार ९७८ जणांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे.

अद्याप तीन हजार ४६७ जणांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यातील १२ हजार ९७८ शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी २९ लाख रुपये जमा झाले आहेत.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top