कृषी महाराष्ट्र

कृषीपंप वीज जोडणी मिळणार राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना : महाराष्ट्र बजेट २०२३

कृषीपंप वीज जोडणी मिळणार राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना : महाराष्ट्र बजेट २०२३

कृषीपंप वीज जोडणी

Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या वीजजोडणीसाठी (Agricultural Pump Electricity Supply) राज्य सरकार (State government) ट्रान्सफार्मर योजना राबवणार आहे. या योजनेत वीज ट्रान्सफॉर्मर नसलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

तसेच राज्यातील ८६ हजार ७३ कृषीपंप (Agricultural pump) अर्जदारांना तात्काळ वीजजोडणी देण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ७५ हजार वार्षिक भाडेपट्टा देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ३ वर्षात ३० टक्के कृषी वीजवाहिन्या सौर ऊर्जेवर करण्यात आल्या आहेत.

या योजनेचा लाभ ९.५० लाख शेतकऱ्यांना झाल्याचा दावाही अर्थसंकल्पात करण्यात आला. (Agriculture Pump)

तसेच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेतून राज्यातील १.५० लाख सौर कृषीपंप राज्यात जोडण्यात आले आहेत.

त्यासोबतच राज्यातील उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीजदर सवलतीची मुदत वाढवण्यात आली आहे. वीजदर सवलतीची नवीन मुदत आता मार्च २०२४ पर्यंत करण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला. शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरीचे महत्त्व लक्षात घेऊन विशेष तरतुदी करण्यात आल्या.

दरम्यान, राज्यातील कृषीपंपाच्या वीजजोडणीचा प्रश्न शेतकऱ्यासाथी महत्त्वाचा आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीजजोडणीसाठी झगडावे लागते. (Agriculture Pump)

यंदाच्या रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागले होते. तसेच विरोधी पक्षानेही सातत्याने कृषीपंपाच्या वीज तोडणीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात खडाजंगी पाहायला मिळत होती.

source : agrowon

Maharashtra Budget 2023, agricultural pump, farmers

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top