कृषी महाराष्ट्र

मागणी येईल तिथं कांदा खरेदी करणार ! राज्य सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांना होणार मोठी मदत

मागणी येईल तिथं कांदा खरेदी करणार ! राज्य सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांना होणार मोठी मदत

मागणी येईल तिथं

कांद्याच्या दरात मोठी घसरण झालयामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहे. नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

कांद्याच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांद्याला कवडीचाही दर मिळत नसल्यामुळे कांदा (Onion Subsidy) बाजारात विकायला न्यावा की नाही ? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. कारण बाजारात कांदा विक्रीस नेल्यानंतर कांद्याची पट्टी हाती येत नाही.

असे असताना आता भविष्यात ज्या-ज्या ठिकाणी मागणी येईल तिथे कांदा खरेदी होईल. नाफेडद्वारे (Nafed) आतापर्यंत 28 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. अजूनही कांद्याची खरेदी करु असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी म्हटले आहे.

राज्यात कांदा (onion) प्रश्नावरुन वातावरण चांगलच तापलं आहे. कांदा दराच्या मुद्यावरुन सभागृहातही विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. तसेच विविध ठिकाणचे शेतकरीही (Farmers) आक्रमक झाले आहेत. अशातच आता यावर राज्य सरकार मार्ग काढण्याच्या तयारीत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्याला पुढच्या आठवड्यात राज्य सरकार दिलासा देण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात (Budget Session) कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितलं.

बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्रे (Onion buying centers) सुरु करण्यात येतील असंही त्यांनी सांगितले होते. सध्या कांदा उत्पादक शेतकरी (Agricultural Information) अडचणीत आहेत. सतत कांद्याला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे याबाबत चर्चा सुरू आहेत.

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top