कृषी महाराष्ट्र

आंबा बागेत भुरी रोगाचा व फुलकीडीचा प्रादुर्भाव का होतो ? वाचा संपूर्ण माहिती

आंबा बागेत भुरी रोगाचा व फुलकीडीचा प्रादुर्भाव का होतो ? वाचा संपूर्ण माहिती

आंबा बागेत भुरी

सध्या आंबा बागा फुलोरा ते फळधारणेच्या अवस्थेत आहेत. कमाल आणि किमान तापमानात तफावत दिसत आहे.

असे हवामान फुलकिडींच्या (Thrips) म्हणजेच थ्रीप्सच्या वाढीसाठी पोषक असते. या किडीचा प्रादुर्भाव आंबा मोहर आणि फळांवर होऊ शकतो.

तसेच रात्रीचे तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहत असल्यास असे तापमान भुरी (Powdery Mildew) रोगाच्या वाढीसाठी पोषक असते.

फुलकीड आणि भुरी रोगाचं नियंत्रण कसं कराव ? ( याविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.)

फुलकीडे कोवळ्या सालीचा भाग खरवडत असल्यामुळे तो भाग काळा पडतो, पाने वेडीवाकडी होतात व नंतर गळून पडतात. मोहराचे दांडे खरवडल्यासारखे दिसतात व मोहर काळा पडून गळून जातो.

फळांवर प्रादुर्भाव झाल्यास फळाची साल खरवडल्यासारखी दिसते. फळांवर खाकी किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसून येतात. लहान फळांची गळ होते. Mango Crop Management

फुलकिडीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड (४५ टक्के प्रवाही) ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यास ८ ते ९ दिवसांनी दुसरी फवारणी थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून करावी. Mango Crop Management

या किडीचा संपूर्ण जीवनक्रम १५ दिवसांमध्ये पूर्ण होत असल्याने नियंत्रणासाठी दुसरी फवारणी लगेचच घेणे आवश्यक असते.

तिसऱ्या टप्प्यातील मोहर आणि नुकतीच फळधारणा झालेल्या आंबा पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो.

भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top