एप्रिलनंतर तूर दरातील तेजी वाढण्याचा अंदाज ! जाणून घ्या एप्रिल मध्ये कसे राहील मार्केट
एप्रिलनंतर तूर दरातील
१) सोयाबीन दर स्थिरावले (Soybean Rate)
देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीन दरात (Soybean Rate) सुधारणा दिसून येत आहे. आज आणि उद्या देशातील महत्वाच्या बाजार समित्यांमधील व्यवहार बंद आहेत. पण सुरु असलेल्या बाजारांमधील दरपातळी टिकून आहे.
आज सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार होते. सोयाबीनचे वायदे १५.१९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडने ४८२ डाॅलरवर होते.
देशात सोयाबीन दरात आणखी सुधारणा होण्यास अनुकूल स्थिती आहे, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
२) कापूस दरात काहीशी सुधारणा (Cotton Bajarbhav)
देशातील आज कापूस दरात (Cotton Rate) क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा दिसली. महत्वाच्या बाजारांमध्ये व्यवहार बंद होते. मात्र काही बाजारांमध्ये व्यवहार झाले. आज कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपये भाव मिळाला.
तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस ८४ सेंट प्रतिपाऊंडवर टिकून होते. देशातील कापूस आवक वाढल्याचा दबाव सरकी आणि सरकी पेंडवर आला. त्यामुळं सध्या दरही दबावात असल्याचं सांगितलं जातं. तरीही कापसाच्या दरात जास्त नरमाई येणार नाही, असेही जाणकारांनी सांगितले. (Tur Market)
३) हरभरा आवक वाढतेय (Chana Bajarbhav)
देशातील काही बाजारांमध्ये नवा हरभरा येत आहे. पण सध्या हरभरा भाव (Chana Rate) दबावात आहेत. जास्त ओलावा असलेल्या हरभऱ्याचे भाव प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर गुणत्तेचा हरभरा ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयाने विकला जातोय.
हरभरा दर दबावात असल्याने नाफेडच्या खरेदीकडे (NAFED) बाजाराचे लक्ष आहे. तसेच वाढत्या उष्णतेचाही फटका हरभऱ्याला बसत आहे. त्यामुळं आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
४) लिंबाचे दर तेजीत
उन्हाचा चटका वाढत असल्याने लिंबाला मागणी वाढताना दिसत आहे. मात्र बाजारातील लिंबू आवक कमी असल्याने लिंबाचे भाव सध्या तेजीत आहेत. लिंबाला सध्या ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.
उन्हाचा चटका मार्च महिन्यानंतर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळं लिंबू आणखी भाव खाऊ शकते, असा अंदाज व्यापारी आणि शेतकरी व्यक्त करत आहेत. Tur Market
५) तुरीचे दर आणखी कधीपासून वाढतील ?
मागील आठवडाभरात तूर बाजारात (Tur Market) समिश्र स्थिती राहिली. आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात (Tur Import) होणाऱ्या तुरीला उठाव कमी होता. तर देशातील तूर शेतकऱ्यांनी मागं ठेवल्याचं दिसतं. त्यामुळं तुरीच्या दरात (Tur Rate) काहिसे चढ उतार होते.
सरकारने तूर आयातीवरील १० टक्के शुल्कही काढले. पण भारतात प्रामुख्याने आफ्रिका आणि म्यानमारमधून तूर आयात होते. हे देश अविकसित असल्याने या देशांमधून आयात होणाऱ्या तुरीवर शुल्क लागू होत नाही. त्यामुळं सरकारच्या या निर्णयाचा तूर बाजारावर परिणाम होणार नाही.
देशात यंदा उत्पादन घट जास्त असल्याने आयातीतूनही गरज पूर्ण होणार नाही. त्यामुळं तुरीचे दर तेजीत राहतील. मार्च महिन्यात सध्याच्या दरात १०० ते २०० रुपयांचे चढ उतार राहू शकतात. पण गुणवत्तेच्या तुरीचे भाव ८ हजार रुपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता नाही.
एप्रिल महिन्यापासून तुरीची आवक कमी राहून दरवाढ होऊ शकते. तर मे आणि जून महिन्यात तुरीच्या दरात आणखी तेजी येण्याचा अंदाज आहे. तुरीचे दर सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात.
त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढाव घेऊनच आपले दराचे टार्गेट ठरवावे आणि विक्री करावी, असं आवाहन तूर बाजारातील अभ्यासकांनी केले.
source : agrowon