कृषी महाराष्ट्र

कांद्याला प्रतिक्विंटल मिळणार अनुदान : वाचा संपूर्ण किती रुपये मिळणार ?

कांद्याला प्रतिक्विंटल मिळणार अनुदान : वाचा संपूर्ण किती रुपये मिळणार ?

कांद्याला प्रतिक्विंटल मिळणार

Onion Subsidy : सध्या राज्यभरात कांद्याच्या दराचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कांद्याच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांद्याला कवडीचाही दर मिळत नसल्यामुळे कांदा बाजारात विकायला न्यावा की नाही?

असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. कारण बाजारात कांदा विक्रीस नेल्यानंतर कांद्याची पट्टी हाती येत नाही. मात्र, शेतकऱ्यांना आपल्या खिशातीलच पैसे कांद्यासाठी मोजावे लागत आहेत. म्हणून राज्यातील कित्येक शेतकरी कांद्यावर थेट रोटर फिरवत आहेत. याच कांदा प्रकरणी आता राज्य सरकार जागृत झालं आहे आणि कांदा उत्पादकांना अनुदान देण्याच्या चर्चा सुरू आहेत.

कांद्याला मिळणार अनुदान

सध्या कांदा उत्पादक शेतकरी (Agricultural Information) अडचणीत आहेत. सतत कांद्याला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे याबाबत चर्चा सुरू आहेत. राज्य सरकार कांदा उत्पादकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी अनुदान देण्याबाबत चर्चा करत आहे. याचा अहवाल पुढील आठवड्यात येऊ शकतो.

किती मिळणार अनुदान ?

आता शेतकऱ्यांना कांद्यासाठी किती अनुदान मिळू शकते ही गोष्ट महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना कांद्यासाठी प्रतिक्विंटल 200 ते 500 रुपये अनुदान देण्याबाबत चर्चा सुरू आहेत. कारण कांदा उत्पादक शेतकरी सध्या दरामुळे संकटात आहेत. याच कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून एक समिती गठीत करण्यात आली आहे. याच समितीचा अहवाल पुढच्या आठवड्यात येऊ शकतो.

कांदा उत्पादकांच्या पाठीशी सरकार

कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या (Agriculture) पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे कनिष्ठ सभागृहात शिंदे म्हणाले. नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) ने कांद्याची खरेदी सुरू केली आहे, ज्यामुळे किंमत वाढेल.” नाफेड ही केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेली सर्वोच्च संस्था आहे.

संतप्त शेतकऱ्यांनी केली कांदा विक्री बंद

महाराष्ट्रातील आशियातील सर्वात मोठ्या कांदा मार्केट ‘लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती’मध्ये सोमवारी कांद्याचे भाव 2-4 रुपये किलोपर्यंत घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री बंद केली. मुख्यमंत्री म्हणाले, “कांद्याच्या निर्यातीवर कोणतेही बंधन नाही. गरज भासल्यास शेतकऱ्यांना काही आर्थिक मदतही केली जाईल.

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top