कृषी महाराष्ट्र

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील लाभार्थी कुटुंबांना २९.९५ कोटी निधी मंजूर

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील लाभार्थी कुटुंबांना २९.९५ कोटी निधी मंजूर

गोपीनाथ मुंडे शेतकरी

Farmer Scheme : शेतकरी अपघात विमा योजनेतून (Farmer Accident Insurance Scheme) अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना २९.९५ कोटी निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. लवकरच लाभार्थी कुटुंबियांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.

तसेच ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या कालावधीला खंडित कालावधी म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या कालावधीत प्राप्त १ हजार ५०८ प्रस्तावाला सरकारने मंजूरी दिली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे. Gopinath Munde accident insurance

राज्यात गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात येते. या योजनेतून राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांना २ लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येते. त्यामध्ये शेतकरी, त्याची पत्नी, आई, मुलगा आणि अविवाहित मुलगी यांना ही मदत दिली जाते.

परंतु ही योजना राज्यात खासगी विमा कंपनीकडून राबवली जात होती. त्यामुळे अनेकदा विमा दावे निकाली काढण्यात दिरंगाई केली जायची. तसेच अनेक वेळा लाभ नाकाराला जायचा.

त्यामुळे राज्य सरकारने आता हे प्रस्ताव शासन नियुक्त समितीद्वारे तपासून मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संबंधित लाभार्थीच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी सहसंचालक तथा मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top