कृषी महाराष्ट्र

Agriculture Machinery Subsidy : १५ लाख कृषी यंत्रांचे शेतकऱ्यांना वाटप ! अनुदान आठ वर्षात वाढले

Agriculture Machinery Subsidy : १५ लाख कृषी यंत्रांचे शेतकऱ्यांना वाटप ! अनुदान आठ वर्षात वाढले

 

Agriculture Machinery Subsidy : देशातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकिकरण योजनेतून कृषी यंत्रांचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना २०१४-१५ पासून आतापर्यंत १५ लाख २३ हजार यंत्र आणि अवजारांचा पुरवठा करण्यात आला. ही योजना केंद्र सरकारच्या अनुदानातून चालते, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

केंद्र सरकारने शेतीमध्ये यांत्रिकिकरण वाढविण्यासाठी केंद्राने कृषी यांत्रिकिकरण मिशन सुरु केले. या योजनेतून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात यंत्रे आणि अवजारे पुरविण्यात आल्याचे सरकार सतत सांगण्यात आले. यासंबंधीचा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी उत्तर दिले. कृषिमंत्र्यांनी आपल्या उत्तरात शेतकऱ्यांना या योजनेचा कसा फायदा होत आहे याची माहिती दिली. Agriculture Machinery Subsidy

कृषिमंत्र्यांनी सांगितले की, २०१४-१५ पासून देशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १५ लाख २३ हजार ६५० कृषी यंत्रे आणि अवजरांचे वाटप करण्यात आले. यामध्ये ट्रॅक्टर्स, पाॅवर टिलर्स, कंबाईन हार्वेस्टर्स, स्वयंचलित यंत्रे, ट्रॅक्टर आणि पाॅवर टिलर चलीत यंत्रे, कृषी ड्रोन आणि पीक संरक्षक यंत्रांचा समावेश आहे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. ही यंत्रा शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांच्या उत्पादनात वाढ झाल्याचाही दावा सरकारने यापूर्वी केला आहे.

शेतकऱ्यांना यंत्रे वेळेवर आणि मुबलक दरावर भाड्याने मिळावे यासाठी जवळपास ४४ हजार अवजारे बॅंक निर्माण करण्यात आल्या आहेत, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. पीक उत्पादन आणि कृषी यांत्रिकिकरण याचा थेट संबंध आहे. यांत्रिकिकरण वाढल्यानंतर शेतीच्या उत्पादनातही वाढ झाली. यांत्रिकिकरणातून वेळ आणि मजूरी वाचते, निविष्ठा आणि अवजारांचा कार्यक्षम वापर होतो, कष्ट वाचते, काढणीपश्चात नुकसानही कमी होते, तसेच पीक उत्पादन आणि शेतीतून मिळणारे उत्पादनही वाढते, असेही कृषिमंत्र्यांनी संसदेत सांगितले. Agriculture Machinery Subsidy

बियाणे आणि खतांमध्येही बचत

कृषिमंत्र्यांनी सांगितले की, शेती क्षेत्रात यांत्रिकिकरण वाढल्याने बियाण्यामध्येही १५ ते २० टक्के बचत झाली आहे. तर खतांमध्ये १५ ते २० टक्के, वेळेत २० ते ३० टक्के, तणांमध्ये २० ते ४० टक्के, मजुरीत २० ते ३० टक्के बचत झाली. तर बियाण्यांच्या उगवणक्षमतेत ७ ते २५ टक्क्यांची वाढ झाली. पिकांची घनता ५ ते २० टक्क्यांनी वाढली आणि पीक उत्पादकतेत १३ ते २३ टक्क्यांची वाढ झाली, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

source : agrowon

Agriculture Machinery Subsidy

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top