कृषी महाराष्ट्र

रुंद वरंबा व सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते ! रुंद वरंबा सरी पद्धत फायदेशीर

रुंद वरंबा व सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते ! रुंद वरंबा सरी पद्धत फायदेशीर

पावसाचे पाणी

यंदा पावसाळा हा कमी प्रमाणात असल असे म्हटले जाते. असे असताना मान्सून देखील उशिरा दाखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशात पावसाचे प्रमाण, तीव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते.

रुंद वरंबा व सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी मुरते. यामुळे पिकांना कमी पाणी लागते. मुलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास तसेच पुढील हंगामातील पिकास लाभ होतो.

हे यंत्र सोयाबीन, तूर, भुईमूग, ज्वारी, बाजरी, उडीद इत्यादी पिकांच्या टोकण पद्धतीने पेरणीसाठी उपयुक्त आहे. यंत्राच्या सांगाड्यावर दोन्ही बाजूला सरी यंत्र असल्यामुळे पडलेल्या सरींमुळे पाण्याचे संवर्धन आणि निचरा होतो.

रुंद वरंबा सरी यंत्रामुळे रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे केलेल्या पेरणीत व पारंपारिक पद्धतीपेक्षा ओलावा जास्त काळ टिकतो. उत्पादनामध्ये पारंपारिक पद्धतीपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते. पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा सरीद्वारे निचरा होतो.

तसेच योग्य प्रमाणात पडलेल्या पाऊस जमिनीत मुरतो. पेरणीचा वेळ वाचतो. यामुळे हे फायदेशीर आहे. यासाठी टोकण यंत्राच्या साहाय्याने आपण चार ओळीतील एक सरी याप्रमाणे पेरणी करतो. त्यासाठी ट्रॅक्टर चालविण्याच्या विविध पद्धतीचा वापर करता येतो.

यंत्राच्या रुंदीनुसार ट्रॅक्टरच्या मागील आणि पुढील दोन चाकातील अंतर मोजून घ्यावे. त्याप्रमाणे त्यात बदल करावा. दोन सऱ्यांमध्ये एक १.२ ते १.५ मीटर रुंदीचा वरंबा तयार होतो. त्यावर टोकण यंत्राच्या साहाय्याने एकाच वेळी खत आणि बियाणे पेरता येते.

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top