कृषी महाराष्ट्र

शेतजमिनींची अदलाबदल आता फक्त २ हजार रुपयांत ! वाचा सविस्तर

शेतजमिनींची अदलाबदल आता फक्त २ हजार रुपयांत ! वाचा सविस्तर

शेतजमिनींची अदलाबदल

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनींची अदलाबदल करण्याची संधी देणारी ‘सलोखा योजना’ नोंदणी, मुद्रांक व शुल्क विभागाने राज्यभरात कार्यान्वित केली आहे.

यासाठी नाममात्र एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार रुपये मुद्रांक शुल्क अशा दोन हजार रुपयांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेतजमीनधारकांचे अदलाबदल दस्तांसाठी सवलत देणारी ‘सलोखा योजना’ राबविण्यात येत आहे. ही योजना पुढील दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे. योजनेत पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रांत कितीही फरक असला, तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील.

कृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस ही योजना लागू नाही, असे नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने सांगितले. पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षांपासून असावा.

एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असल्याचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी विहित पंचनामा नोंदवहीत करणे आवश्यक. हा पंचनामा नोंदवहीवरून तलाठ्यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना द्यावे.

अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी हा पंचनामा दस्तास जोडला पाहिजे. अशा प्रकारे काही अटी देखील देण्यात आल्या आहेत.

source:krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top