कृषी महाराष्ट्र

सूक्ष्म सिंचनासाठी शेतकरी मित्रांना मिळणार 70 हजार रुपये ? वाचा संपूर्ण माहिती

सूक्ष्म सिंचनासाठी शेतकरी मित्रांना मिळणार 70 हजार रुपये ? वाचा संपूर्ण माहिती

सूक्ष्म सिंचनासाठी शेतकरी

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाण्याचा साठा प्रचंड महत्त्वाचा असतो. त्यासोबतच शेतीतील (Agriculture) पिकाला पाणी देण्यासाठी सिंचनाची गरज भासते. परंतु सिंचनाचा आर्थिक (Financial) खर्च शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नसतो. याच कारणास्तव शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. आता सूक्ष्म सिंचनाच्या (Micro Irrigation) अनुदानासाठी शेतकऱ्यांना कोट्यवधींचा निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात सूक्ष्म सिंचनासाठी (Micro Irrigation) शेतकऱ्यांना किती निधी मिळू शकतो.

केंद्राकडून मिळणार कोट्यवधींचा निधी

राज्यातील कृषी विभाग आणि ठिबक कंपन्यांमधील समन्वयामुळे सूक्ष्म सिंचन (micro irrigation) योजनेमध्ये सहभागी झालेल्या आणखी 70 हजार शेतकऱ्यांना लवकरच 100 कोटी रुपयांचे अनुदान केंद्राकडून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे केंद्राकडून जबरदस्त गिफ्ट मिळणार आहे. शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाची केंद्राकडून 60 टक्के तर राज्याकडून 40 टक्के अनुदान दिले जाते.

कशासाठी मिळते अनुदान ?

शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेत ठिबक संच, तुषार संच, वर्षा प्रणाली तसेच सॅंड फिल्टर, पाइप, हाड्रो सायक्लोन फिल्टर, फर्टिलायझर्स टॅंक व ड्रीप लाइन वाइंडर याकरता अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत अनुदान दिले जाते. तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून पूरक अनुदान देण्यात येते.

शेतकऱ्यांना अनुदानामुळे आर्थिक दिलासा

शेतकऱ्यांना शेतीतील पिकाला पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन जास्त फायद्याचं ठरतं. कारण या सूक्ष्म सिंचनामुळे पाणी जास्त वाया जात नाही. त्याचवेळी शासनाच्या माध्यमातून सिंचनासाठी विविध योजनांद्वारे अनुदान दिले जाते. त्याचमुळे शेतकऱ्यांना शेती करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक दिलासा मिळतो.

ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी शेतकरी योजनावर क्लिक करावे. पुढे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निवडावी. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी पहिल्यांदा नोंदणी करण्यासाठी नवीन वापरकर्ता नोंदणीवर क्लिक करा. पुढे शेतकऱ्यांनी त्यांचं नाव टाकावे, युजर नेम आणि पासवर्ड टाकून महाडीबीटीवर लॉगीन तयार करा त्यासाठी शेतकऱ्याकडे ईमेल आयडी असणं बंधनकारक असून त्यांचं आणि मोबाईल नंबंरचं व्हेरिफिकेशन करावं लागते. लॉगीन करुन अर्ज भरावा लागेल. लॉगीन केल्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकून आधार प्रमाणीकरण करुन घ्या. शेतकऱ्यांनी वैयक्तिक माहिती, शेती जमिनीची माहिती भरा.

लॉगीन केल्यानंतर शेतकऱ्यांनी पुढील माहिती भरुन एकाच अर्जाद्वारे विविध योजनांचा लाभ घेता येतो. त्यापैकी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पर्याय निवडून पुढे जावे. कृषी सिंचन योजना हा पर्याय निवडावा. त्यानंतर हव्या असलेल्या सिंचन प्रकाराचा पर्याय निवडावा. सर्व माहिती भरुन अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करावे.अर्ज सादर केल्यानंतर प्राधान्य क्रमांक निवडावा.त्यानंतर अर्जाची फी भरावी. यासाठी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतात.

महाडीबीटी पोर्टलवरुन विविध शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी एक शेतकरी-एक अर्ज या पद्धतीद्वारे एकचं अर्ज करणं अपेक्षित आहे. त्यामुळे दुसरा अर्ज करता येणार नाही. परंतु पहिला अर्ज रद्द करुन पसंतीच्या सर्व बाबींसाठी पुन्हा नव्यानं एकच अर्ज करता येईल. त्यासाठी पहिला अर्ज रद्द करावा लागेल.

source : mieshetkari.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top