कृषी महाराष्ट्र

सांगलीत शेतकरी फुलवत आहेत ड्रॅगन फ्रुट चे मळे : मिळतोय भरपूर फायदा

सांगलीत शेतकरी फुलवत आहेत ड्रॅगन फ्रुट चे मळे : मिळतोय भरपूर फायदा

ड्रॅगन फ्रुट चे मळे

Dragon Fruit in Maharastra : देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) पडतो. त्यामुळं तिथं पाण्याची समस्या निर्माण होते. पाण्याच्या समस्यामुळं तिथे बागायती शेती करता येत नाही. महाराष्ट्रातही काही भागात कमी पाऊस पडतो. पण कमी पावसाच्या ठिकाणी देखील शेतकरी नव नवीन प्रयोग करत आहेत. महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यातील काही भाग हा दुष्काळग्रस्त आहे. त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे. या भागात आता ड्रॅगन फ्रुटचे (Dragon Fruit) उत्पादन घेतलं जात आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळताना दिसत आहे.

ऊसाच्या शेतीला बगल, शेतकरी घेतायेत ड्रॅगन फ्रुटचं उत्पादन

योग्य प्रकारचं पीक येण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर पाण्याची गरज असते. एकही पिक असे आहे की ज्याला पाण्याची गरज नाही. परंतू दुष्काळी भागात कमी पाण्यात ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतले जात आहे. कमी खर्चात चांगला नफा या पिकातून मिळवला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारही देखील ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीला चालना देत आहेत. या पिकाच्या लागवडीमुळं शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील काही भागा हा दुष्काळग्रस्त आहे.

कमी पाऊस असूनही अनेक शेतकरी तिथे ऊसाची लागवड करत होते. ऊसाच्या पिकासाठी भरपूर पाणी लागते. पण पाऊस कमी झाल्यामुळं तिथे पाण्याची समस्या निर्माण होत होती. त्यामुळं गेल्या काही वर्षांत येथील अनेक शेतकऱ्यांनी ऊस, द्राक्षे, सोयाबीन आणि भाजीपाला ही पारंपरिक पिके सोडून शेतकरी ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीकडे वळले आहेत. सांगलीत सुमारे 10 ते 15 शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरु केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेत आहेत.

सुरुवातीला जास्त गुंतवणूक करावी लागते

सुरुवातीला ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी गुंतवणूक थोडी जास्त असते. मला सुरुवातील सुमारे 15 लाख रुपये गुंतवावे लागल्याची माहिती सांगलीच्या तडसर गावातील शेतकरी आनंदराव पवार यांनी सांगितले. मी गेल्या सहा वर्षापूर्वी ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्याचे त्यांनी सांगितले. मी ड्रॅगन फ्रूटचे चांगले उत्पादन घेऊन वर्षभरातच निम्मा खर्च वसूल केल्याचे आनंदराव पवार म्हणाले. 2013 मध्ये सोलापूरच्या एका शेतकऱ्याकडून प्रेरणा मला मिळाल्याचे आनंदराव पवार यांनी सांगितले. दीड एकर शेतात ड्रॅगन फ्रूट पिकवून सोलापूरचा शेतकरी 27 लाख रुपये कमावत होता. यानंतर 2016 मध्ये आनंद पवार यांनीही ही शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला 200 किलोचे उत्पादन मिळाले, आज सहा वर्षांनंतर ते उत्पादन 8 हजार 500 किलोपर्यंत गेल्याची माहिती आनंदराव पवार यांनी दिली.

ऊसाची शेती करणारे शेतकरी करतायेत ड्रॅगन फ्रूटची लागवड

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वांगी गावचे शेतकरी राजाराम देशमुख हे देखील अनेक वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटची लागवड करत आहेत. त्यांनी दोन एकर शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. पूर्वी ते ऊसाची पारंपारिक शेती करत होते. परंतू ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्यानं त्यांनी पूर्णपणे ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. कमी पाण्यात हे पीक चांगल्या प्रकारे येत असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

देशासह परदेशातही ड्रॅगन फ्रूटची निर्यात

ड्रॅगन फ्रूटला भारतात विदेशी फळ म्हणतात. पण गेल्या काही वर्षांत देशातील शेतकऱ्यांनी त्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. पण आता हे विदेशी फळ परदेशातही निर्यात होत आहे. वांगी आणि तडसर गावातील आनंदराव पवार आणि राजाराम देशमुख हे आज ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून चांगले उत्पन्न घेत आहेत. या शेतकऱ्यांनी 2021 मध्ये ड्रॅगन फ्रूट दुबईला निर्यात केले होते. याचबरोबर राजाराम देशमुख यांनी यावर्षीही सुमारे 50 किलो ड्रॅगन फ्रूट न्यूझीलंडला निर्यात केले आहे. आज महाराष्ट्रातील सांगलीचे ड्रॅगन फ्रूट हैद्राबाद, बंगळुरू, गुवाहाटी येथे पसंत केले जात आहे. ड्रॅगन फ्रुट चे मळे

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top